वृद्ध वयातल्या ‘तुमच्या’शी आजच बोला !
तरुण वयात आपण जसे दिसतो किंवा असतो, तसे वृद्ध वयात नसू याची प्रत्येकाला कल्पना आहे. आपण 60 ते 70 वर्षांचे झाल्यानंतर कसे दिसू, हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. असे औत्सुक्य असणाऱ्यांसाठी संशोधकांनी एक उपाय शोधला आहे. आणि आज 20 ते 30 वर्षांचे असाल, तर आपल्या वयाच्या सत्तरीत आपण असे दिसाल याचे एक आभासी रुप निर्माण करण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. तो यशस्वी झाल्यास आजचे तुम्ही, 7 वर्षांच्या तुमच्याशी आजच बोलू शकणार आहात किंवा संवाद साधू शकणार आहात. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संशोधन संस्थेच्या काही संशोधाकांनी ‘फ्यूचर यू’ किंवा ‘भविष्यातले तुम्ही’ नामक एक अभियान हाती घेतले आहे. आजच्या तुलनेत आणखी 30 ते 40 वर्षांनी तुम्ही कसे दिसाल, याचे एक आभासी रुप निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.