For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृद्ध वयातल्या ‘तुमच्या’शी आजच बोला !

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृद्ध वयातल्या ‘तुमच्या’शी आजच बोला
Advertisement

तरुण वयात आपण जसे दिसतो किंवा असतो, तसे वृद्ध वयात नसू याची प्रत्येकाला कल्पना आहे. आपण 60 ते 70 वर्षांचे झाल्यानंतर कसे दिसू, हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. असे औत्सुक्य असणाऱ्यांसाठी संशोधकांनी एक उपाय शोधला आहे. आणि आज 20 ते 30 वर्षांचे असाल, तर आपल्या वयाच्या सत्तरीत आपण असे दिसाल याचे एक आभासी रुप निर्माण करण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. तो यशस्वी झाल्यास आजचे तुम्ही, 7 वर्षांच्या तुमच्याशी आजच बोलू शकणार आहात किंवा संवाद साधू शकणार आहात. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संशोधन संस्थेच्या काही संशोधाकांनी ‘फ्यूचर यू’ किंवा ‘भविष्यातले तुम्ही’ नामक एक अभियान हाती घेतले आहे. आजच्या तुलनेत आणखी 30 ते 40 वर्षांनी तुम्ही कसे दिसाल, याचे एक आभासी रुप निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.

Advertisement

आणखी तीन ते चार दशकांच्या नंतर आपण नेमके असे दिसणार आहोत, कसे बोलणार आहोत, हे या तंत्रज्ञानाच्या आधाराने आपल्याचा आजच दिसणार आहे. त्यामुळे ‘आपुलाची वाद (वृद्धत्वातल्या) आपणासी’ असा अद्भूत अनुभव आपल्याला येणार आहे. या संबंधातील संशोधन वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या संस्थेतील संशोधक करीत असून त्यांना प्राथमिक परिणाम अतिशय समाधानकारक असे मिळाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या संभाव्य तंत्रज्ञानाचे अनेक लाभ सांगितले जात आहेत. आपले तीस चाळीस वर्षांनंतरचे स्वरुप आजच आपल्या दृष्टीसमोर आल्याने वृध्दत्वाची भीती दूर होणार आहे. तसेच वृद्धपणी आपल्याला कोणत्या शारिरीक किंवा अन्य समस्या येऊ शकतात, हे देखील आजच समजण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे त्या परिस्थितीसाठीची सज्जता आजच करुन ठेवणे आपल्याला शक्य होणार आहे. एखाद्या कालयंत्राप्रमाणे हे तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर आपल्याला साहाय्यभूत ठरु शकेल, असे अनुमान आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.