कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालिबानी विदेशमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

07:00 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काबूल : भारत आणि अफगाणिस्तानच्या दृढ मैत्रीमुळे पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकार सातत्याने तालिबानला लक्ष्य करत अफगाणिस्तान भारताच्या इशाऱ्यानुसार काम करत असल्याचा आरोप करत आहे. याचदरम्यान तालिबानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानला भारतासोबत संबंध राखण्यापासून कुणीच रोखू शकत नसल्याचे म्हणत एकप्रकारे पाकिस्तानला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे विदेशधोरण पूर्णपणे स्वतंत्र असून राष्ट्रीय हितांच्या आधारावर आम्ही अन्य देशांसोबत संबंध निर्माण करत आहोत. पाकिस्तानचा भारतात दूतावास आहे, मग अफगाणिस्तानला या अधिकारापासून का ठेवले जावे असा प्रश्न मुत्ताकी यांनी उपस्थित केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article