महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नियतीने नेले... रोटरीने वाचविले

11:17 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्लबच्या पुढाकाराने चिमुकलीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया : अवयव दान केलेल्या व्यक्तीचे कुटुंब दुहेरी मनस्थितीत

Advertisement

बेळगाव : एका जीवनाची इतिश्री होत असताना त्याचवेळी त्याच कुटुंबातील एका दुसऱ्या व्यक्तीच्या विझत चाललेल्या जीवनामध्ये आशेचे किरण फुलविण्याची कामगिरी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने केली आहे. क्लबच्या पुढाकारामुळे एका दोन वर्षीय चिमुकलीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात येऊन तिला जीवदान देण्यात आले. याचा आनंद कुटुंबीयांना झाला आहे. परंतु या आनंदाला दु:खाची एक किनारही आहे. कारण महिन्याभरापूर्वीच या चिमुकलीच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी वडिलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन दुसऱ्यांना जीवदान दिले.

Advertisement

नियती कोणाच्या जीवनामध्ये कसे फासे टाकेल, हे सांगता येत नाही. सौंदत्ती तालुक्यातील हिरेबुदनूर गावातील 24 वर्षीय हणमंत सरवी यांना अपघात झाला. त्यांना केएलईमध्ये आणल्यानंतर त्यांचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, हणमंत यांच्या दोन वर्षीय मुलीच्या छातीत असह्या वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी त्वरित तपासणी केल्यानंतर तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक बनले होते. तसा सल्ला केएलईमधील पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. वीरेश मानवी यांनी कुटुंबीयांना दिला. केएलईमधील हृदयरोग तज्ञ डॉ. धनंजय साळवे यांनी या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. रोटरी क्लब साऊथ व रोटरी गोल्ड कोस्ट क्लब युएसए यांच्या भागीदारीमधून ‘गिफ्ट ऑफ लाईफ’अंतर्गत ‘ग्लोबल ग्रँट’च्या माध्यमातून लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. याची कल्पना असल्याने डॉ. धनंजय साळवे यांनी रोटरी पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. सदर क्लबने आतापर्यंत लहान मुलांच्या हृदयावरील 15 शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

ब्रेन डेड झालेल्या हणमंतचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्याचवेळी त्या मुलीला होणाऱ्या वेदना लक्षात घेऊन डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले. यासाठीच्या सर्व प्रक्रिया रोटरी क्लब साऊथने पूर्ण केल्या आणि त्या मुलीच्या हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. शनिवारी दुपारी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबप्रमुख हयात नाही, याचे दु:ख करावे की त्यांच्या मुलीला जीवदान मिळाले याचा आनंद मानावा, अशा दुहेरी मनस्थितीतून हे कुटुंब जात आहे. शनिवारी रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश पाटील, सचिव भूषण मोहिरे, ग्रँट को-ऑर्डिनेटर चैतन्य कुलकर्णी, आरती अंगडी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन हणमंतच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्या मुलीच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी व कार्डिअॅक सर्जरी विभागप्रमुख डॉ. मोहन गान यांनी रोटरी क्लब साऊथच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हणमंतच्या कुटुंबीयांनी रोटरीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशा वेळी प्रसिद्ध कवी समीर सामंत म्हणतात, त्याप्रमाणे -

‘लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले

पाउले चालो पुढे, जे थांबले ते संपले’

याचेच प्रत्यंतर रोटरी क्लब साऊथने आपल्या कृतीतून दिले आहे.

‘आसू अन् हसू’चा खेळ!

हणमंत यांचे महिन्याभरापूर्वी निधन झाले. त्यावेळी गर्भवती असलेल्या त्यांच्या पत्नीला हा धक्का पचविणे कठीण होते. कुटुंबीयांच्या धीरामुळे त्या सावरल्या आणि पाच दिवसांपूर्वी त्यांना पुत्ररत्न झाले. त्यामुळे या कुटुंबामध्ये सध्या ‘आसू आणि हसू’चा खेळ सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article