महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

12:32 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदार सदानंद शेट तानावडे यांचे आवाहन

Advertisement

पेडणे : विकसित भारत संकल्प यात्रा हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समोर ठेवली. वेगवेगळ्या योजना प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचवण्याचं कामही केलं. सरकारी जेवढ्या योजना आहेत .शिवाय विश्वकर्मा योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार मंत्री पंचायत मंडळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. असे आवाहन राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे यांनी कासर्वरणे येथील विकसित भारत यात्रा या उपक्रमाचा शुभारंभ 2 रोजी  करताना प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर पेडणे भाजप गट अध्यक्ष तुळशीदास गावस, सरपंच अवनी गाड गटविकास अधिकारी शुभम भर्तू  , उपसरपंच साक्षी नाईक,पंच वृषाली नाईक , नवनाथ नाईक , सोनम परब,  स्वयंमित्र सहाय्यक अभियंते  वाटू सावंत आदी  उपस्थित होते. यावेळी वेगवेगळे सरकारी खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या योजना संदर्भात माहिती देण्यासाठी उपलब्ध होते. विश्वकर्मा योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.

Advertisement

गरिबी 12 टक्के

खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पुढे बोलताना सांगितले पूर्वी देशात गरिबी दारिद्र्यरेषेखाली संख्या 22 टक्के होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व हाती घेतल्यानंतर भारत विकसित करत असताना टप्प्याटप्प्याने सर्व भारतीयांचा विकास करण्याबरोबरच गरिबी संख्येमध्ये घड मिळवली. बावीस टक्क्यावरून आता 12 टक्क्यावर दारिद्र्यरेषा पोहोचल्याचे सदानंद शेट तानावडे म्हणाले.

प्रतिज्ञा स्थानिक भाषेत सादर करा

खासदार सदानंद शेट  तानावडे यांनी यावेळी गटविकास अधिकारी श्री शुभम  भर्तू यांनी इंग्रजीमध्ये उपस्थित नागरिकांना मान्यवरांना इंग्रजी मध्ये शपथ दिली. त्यानंतर तानावडे यांनी ही शपथ सर्वसामान्य नागरिकांना ग्रामीण भागातील नागरिकांना कळली पाहिजे, अनेकांना इंग्रजी मध्ये काय असतं हे कळत नाही. त्यामुळे मराठी आणि कोकणी मध्ये भाषांतर करून ती प्रतिज्ञा लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम करावे असे आवाहन केले. यावेळी जेष्ठ नागरिक भास्कर पारब यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना सांगितले भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवतो आणि वर्षाचे बाराही महिने लोकांच्या संपर्कात असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्पना यात्रा गावागावात पंचायत पातळीवरून आयोजित केली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक सरकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काम करूया असे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article