For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील गायरान जमिनी ताब्यात घ्या

11:06 AM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील गायरान जमिनी ताब्यात घ्या
Advertisement

कागदपत्रांची पडताळणी करण्याची आवश्यकता : महसूल मंत्र्यांना मागणीचे निवेदन

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह आसपासच्या गावात असलेल्या गायरान जमिनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जमिनी बळकावून मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. तसेच या जमिनींची वेगवेगळ्या प्रकारे विल्हेवाटही लावण्यात येत आहे. या सर्व जमिनीत सरकारने कागदपत्रांची पडताळणी करून पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंत बिरजे यांनी नुकतीच महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा हे कुसमळी पुलाच्या पाहणीसाठी आले असता भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी महसूल मंत्र्यांनी निवेदन स्वीकारुन आपण चौकशी करून कारवाई करू, असे शिष्टमंडळाला सांगितले आहे.

खानापूर शहरातील तसेच शहरालागतच्या आसपासच्या गावातील सरकारी गायरान जमिनी बेकायदेशीररित्या बळकावण्यात आल्या आह त. या सर्व जमिनी एका समाजाच्या लोकानी बळकावल्या आहेत. जमिनी बळकावत असताना शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणताही सरकारी आदेश नसताना अथवा जमिनी मंजूर झालेल्या नसताना स्वत:च्या नावे करून या जमिनींचा उपभोग घेत आहेत. तसेच काही जमिनींची विल्हेवाटही लावण्यात आलेली आहे. काही जमिनीवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून व्यावसायिक गाळे निर्माण करण्यात आले आहेत. यावेळी यशवंत बिरजे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, विनायक मुतगेकर, सुरेश जाधव, भैरू पाटील, भरतेश तोरोजी, प्रसाद पाटील, महादेव कोळी यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

खोटी कागदपत्रे सादर करून निकाल

या विरोधात आवाज उठविल्यानंतर न्यायालयाची तसेच प्रांताधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून दिशाभूल करून निकाल लावून घेण्यात आले आहेत. या सर्व जमिनींची पुन्हा योग्यरितीने पडताळणी करून या जमिनी पुन्हा सरकार जमा कराव्यात, अशा मागणीचे निवेदन महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्याकडे काँग्रेसच्यावतीने एका शिष्टमंडळाने निवेदन देवून मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.