For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लीज संपलेल्या जागा ताब्यात घ्या

07:50 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
लीज संपलेल्या जागा ताब्यात घ्या
Advertisement

मनपा लेखा स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना      

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांचे लीज संपूनदेखील त्या जागा ताब्यात घेण्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे? तातडीने लीज संपलेल्या जागा ताब्यात घेण्यात याव्यात, खासगी सकिंग मशिन चालकांना नोटीस का देण्यात आली नाही?  बैठक असूनही अधिकारी गैरहजर आहेत. गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस जारी करावी, अशा विविध कारणांवरून महापालिकेची लेखा स्थायी समितीची बैठक गाजली.

Advertisement

मंगळवार दि. 11 रोजी स्थायी समिती सभागृहात लेखा स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदू मिरजकर होते. बैठकीच्या सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी प्रियंका विनायक यांनी मागच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून विविध विषयांना मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी प्रामुख्याने मनपाच्या लीजवरील जागांचा प्रश्न चर्चेत आला. महानगरपालिकेच्या जागा लीजवर देण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश जागांची लीज संपून अनेकवर्षे उलटली आहेत. तशा जागा पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी सूचना यापूर्वीही महसूल विभागाला करण्यात आली होती. मात्र अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे तातडीने लीज संपलेल्या जागा ताब्यात घ्याव्यात.

काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर नेमकी किती प्रकरणे न्यायालयात आहेत, अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी 14 प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या सकिंग मशिन असतानाही मनपातील कर्मचारी खासगी सकिंग मशिन चालकाला संपर्क साधत आहेत. काही मशिन चालकांनी महानगरपालिकेकडून परवानाही घेतलेला नाही. अशा मशिन चालकांना नोटीस जारी करावी, अशी सूचना यापूर्वी झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र त्यावरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तातडीने खासगी सकिंग मशिन चालकांना नोटीस जारी करण्याची सूचना करण्यात आली.  यावेळी सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, सदस्य शिवाजी मंडोळकर, रवी धोत्रे यांच्यासह इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.