For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : गोरे, चाकणकरांवर कायदेशीर कारवाई करा ; शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आक्रमक

03:24 PM Nov 04, 2025 IST | NEETA POTDAR
satara   गोरे  चाकणकरांवर कायदेशीर कारवाई करा   शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आक्रमक
Advertisement

               फलटण पोलीस ठाण्यासमोर सुषमा अंधारेंचा मोठा आंदोलन

Advertisement

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तिने लिहिलेल्या चार पानी पत्रात ज्यांची नावे आहेत, ज्यांच्याबर आमचा संशय आहे त्यांचीच नावे आरोपपत्रात नसतील तर तपासाला काय अर्थ आहे. एखाद्याच्या लेकराच्या चारित्र्याबर शिंतोडे उडवण्याचा अधिकार रूपाली चाकणकर व जयकुमार गोरे यांना विला कुणी? याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? असा सवाल करून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याबर आपला आक्षेप आहे. इथली माणसं किड्या मुंग्यांसारखी मरतात हे केबल फलटण पोलीस ठाण्याचेच नव्हे तर इथल्या खासवार ब आमदारांचे देखील अपयश असल्याची टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारे या सोमवारी फलटण येथे आल्या होत्या. या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्याशी चर्चा करताना त्या बोलत होत्या. यावेळी पीडितेचे वडील, भाऊ, नातलग, शिवसैनिक व नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

पीडित महिला डॉक्टरने आपल्या चार पानी पत्रामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवले होते की, जर माझे काही बरे-वाईट झाले तर ही ही माणसे त्याला जबाबदार असतील. मग असे असताना देखील केवळ गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांच्यावरच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, परंतु अन्य सहा जणांना मात्र मोकाट सोडले आहे. या घटनेच्या तपासासाठी तेजस्विनी सातपुते यांची नेमणूक झाली आहे. सातपुते यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही किंवा त्यांच्याबद्दल मतभेदही नाहीत हे आपण नम्रपणे व जबाबदारीने सांगतो.

परंतु आमचे म्हणणे असे आहे की, जेव्हाएकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची मोनोपाली तयार होते, एकाधिकारशाही तपार होते. जेव्हा तीन ते चार अधिकारी असतात तेव्हा कंट्रोल असतो व तपास योग्य दिशेने जातो. त्यामुळे न्यायालयीन उच्चस्तरीय चौकशी नेमावी अशी जामची व तिच्या कुटुंबीयांची मागणी आहे असे स्पष्ट करून सुषमा अंधारे म्हणाल्या, पीडितेच्या मृत्यूपरांत तिच्यावरची ज्यांनी तांधणे लावण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलीस प्रशासन समज देणार आहे की नाही. सदर पीडितेचे सीडिआर जर आफ्त्याकडून लीक झाले नाहीत तर ते पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले का? ज्यावेळी सनाली चाकणकर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या त्यावेळी तुषार दोशी शेजारीच बसले होते. तेव्हा तपासातील गोष्ठी आपण बोलू शकत नाही असे सांगून वाकणकर यांना त्यांनी का रोखते नाही, त्यांना त्यांनी एवढे का बोलू दिले असा सवाल अंधारे यांनी व्यक्त केला.

आज स्वतः तुषार दोशी इवे येणे आवश्यक होते, परंतु ते आले नाहीत. मी शांतपणे येणार व जाणार असे सांगितले असताना देखील तुम्हाला दीड ते दोन हजार पोलीस इथे थांबवण्याची गरजच काय तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी हे पोलीस ठेवले असून गर्दीच्या नियोजनासाठी ठेवलेले नाहीत.

तिचे चारित्र्य ठरवणारे हे कोण ?

सदर घटनेचा तपास चालू असून त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही असे उत्तर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिले. त्याचाच धागा पकडून हीच गोष्ट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व मंत्री जयकुमार गोरे यांना आपण सांगावी. जयकुमार गोरे कोण तीसमार खान की टिकोजीराव आहेत का? त्यांचा काय संबंध होता. जयकुमार गोरे हे चारित्र्य ठरवणार का त्यांनी अगोदर स्वतःचे चारित्र्य बघावे. गोरे व चाकणकर यांनी एकदा स्वतःला तपासावे मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावेत असा संताप सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.

फलटण पोलीस स्टेशनबाहेर घोषणाबाजी अन् ठिय्या

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास फलटण शहरात आगमन झाले. अधिकार गृहाकडे येण्यापूर्वी त्यांनी फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण केले. त्या अधिकार गृह येथे आल्यानंतर उपस्थित मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर सुषमा अंधारे यांच्यासह सदर डॉक्टर महिलेचे वडील, भाऊ, नातलग यांच्यासह मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले शिवसैनिक व नागरिकांसमवेत अंधारे या चालत फलटण शहर पोलीस ठाण्याकडे रवाना झाल्या.

गिरवी नाका येथे पोलिसांनी बॅरिकेट लावून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर बॅरिकेट बाजूस करून त्या फलटण पोलीस ठाण्याकडे निघाल्या. फलटण पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर त्यांनी या ठाण्यासमोरील रस्त्यावरच ठाण मांडले. यावेळी उपस्थितांमधून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलकांकडून शिष्टमंडळाने आत जाऊन निवेदन देत चर्चा करण्यापेक्षा तपासी अधिकारी विशाल खांबे यांनी येथे यावे आमचे निवेदन स्वीकारावे व आमच्याशी चर्चा करावी असा आक्रमक पवित्रा घेत, जोवर ते येणार नाहीत तोवर आपण येवून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी शिष्टाई केली व खांबे यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली व त्याप्रमाणे त्यांनी निवेदन स्वीकारले व चर्चा देखील केली.

एकंदरीत आजच्या अंधारे यांच्या या आंदोलनामुळे फलटण तालुक्यातील वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले. शहरात ग्रामीण भागात सर्वत्र याच आंदोलनाची चर्चा होती. तसेच हे आंदोलन पाहण्यासाठी फलटण शहर व ग्रामीण भागातील अनेकांची या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता फलटण शहरात सर्वत्र विशेष करून अधिकार गृह व फलटण पोलीस ठाणे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.