महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा

10:18 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दलित संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत घटनेत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक दलित युवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले. कोटनूर गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत. एका थोर व्यक्तीचा करण्यात आलेला अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी.घटनेत सहभागी असणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महेश कोलकार, यल्लाप्पा कोलकार, महांतेश मॅगीनमनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article