For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नियम झुगारून खोदाई करणाऱ्या गॅस कंपनीवर कारवाई करा

04:28 PM Dec 29, 2023 IST | अनुजा कुडतरकर
नियम झुगारून खोदाई करणाऱ्या गॅस कंपनीवर कारवाई करा
Advertisement

सावंतवाडी |  प्रतिनिधी

Advertisement

शिरोडा नाका ते टोपीवाला तंत्रनिकेतन स्कुल पर्यतच्या रस्त्याची खोदाई गॅस पाईपलाईन साठी करण्यात येत आहे. पाईपलाईन खोदाई करताना नळपाणी योजनेची पाईपलाईन फुटली आहे. तसेच, पाईपलाईन योग्य पद्धतीने घालण्यात येत नाही. यासंदर्भात माजी नगरसेवक परिमल नाईक यांच्या नेतृत्वाखाली उदय नाईक, नासिर शेख,राजू बेग , सुधीर आडिवरेकर यांनी सावंतवाडी न . प चे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यासंदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे. निवेदनात माजी नगरसेवक यांनी म्हटलेय की , नगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यावर गॅस पाईप लाईन घालण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. पुणे या कंपनीला आपल्या कार्यालयाकडुन खोदाईची परवानगी 13 एप्रिल २०२३ रोजी देण्यात आलेली होती. सदर परवानगी देताना काही अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. कंपनीमार्फत गॅस पाईप खोदाईचे काम चालु असुन घातलेल्या अटी व शर्ती चे पालन न कारता सदर कंपनीमार्फत काम सुरू आहे . ज्यामध्ये प्रामुख्याने कायमस्वरूपी वॉटर टॅन्कर न ठेवणे, १० टन वजनाचा रोड रोलर न वापरणे, कामाच्या ठिकाणी कुशल प्लंबर न ठेवणे, रस्ता सुरक्षेतेविषयी खबरदारी न घेणे इ. तसेच अनेक त्रुटीमुळे धुळीचे साम्राज्य झाल्यामुळे स्थानिक नागरीकांना व रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना धुलीकरणामुळे प्रचंड त्रास होत आहे. व त्यांच्या आरोग्यास तसेच रस्ता सुरक्षितेकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर अपघात घडुन जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनामार्फत लायक अधिकारी/कर्मचारी यांच्या मार्फत सदर रस्त्याच्या कामकाजाकडे सुपरव्हिजन होत नसल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. कंपनीचे कामकाज नियमानुसार न चालल्यामुळे आपण स्वतः व व्यक्तीशः बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जागेवर भेट देऊन अटी व शर्तीनुसार कामकाज चालते कसे? याचे निरिक्षण करून संबंधीत कंपनीचे कामाकाज बेकायदेशिर चालु असल्यामुळे त्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच या पुढे कोणत्याही कारणासाठी रस्ते खोदाई करावयाची झाल्यास बोर-ड्रील पद्धतीने करणे आवश्यक आहे. असे या नगरसेवकांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात उचित कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी साळुंखे यांनी दिले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.