महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उपनिरीक्षक महांतेश यांच्यावर कारवाई करा

11:02 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रा. पं. सदस्य गजीनकर यांना मारहाणप्रकरणी माजी आमदार रुपाली नाईक यांची मागणी

Advertisement

कारवार : कारवार तालुक्यातील सदाशिवगड (चिताकुला) ग्राम पंचायतीचे सदस्य आणि भाजपच्या शक्ती केंद्राचे प्रमुख दिलीप ज्ञानेश्वर गजीनकर यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केलेल्या सदाशिवगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महांतेश आणि अन्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांच्याकडे कारवारच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्षा रुपाली नाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement

गेल्या मंगळवारी सदाशिवगड येथील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्यावेळी क्षुल्लक कारणापोटी गजीनकर आणि महांतेश यांच्यामध्ये वाद झाला होता. बुधवारी पहाटे पोलिसांनी गजीनकर यांना ताब्यात घेऊन मारहाण केली होती. आपल्या पक्षाच्या ग्राम पंचायत सदस्याला करण्यात आलेल्या मारहाणीचे प्रकरण भाजप स्थानिक नेत्यांनी गांभीर्याने घेतले असून गजीनकर यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार रुपाली नाईक यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात असे म्हटले आहे की, गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी उपनिरीक्षक महांतेश यांनी विनाकारण भाविकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर क्षुल्लक कारणापोटी पोलिसांनी गजीनकर यांना ताब्यात घेतले व जबर मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांचा पोलिसांकडून मानसिक छळ करण्यात आला. गजीनकर यांना जबर मारहाण होऊनही डॉक्टरांनी खोटे प्रमाणपत्र दिले आहे. खोटे प्रमाणपत्र देण्याऱ्या डॉक्टरांवरही कारवाई झाली पाहिजे. अशा घटनांची पुनरावृत्ती झाली तर भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रुपाली नाईक यांनी दिला आहे. यावेळी कारवारचे नगराध्यक्ष रविराज अंकोलेकर, सुमास गुणगी, नागेश कुर्डेकर, सुरज देसाई, कारवारचे नगरसेवक, सदाशिवगड ग्राम पंचायतीचे सदस्य, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

खासदारांकडून मारहाणीचा निषेध

दरम्यान दिलीप गजीनकर यांना सदाशिवगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महांतेश आणि अन्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी निषेध केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article