ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या आर्थिक संस्थांवर कारवाई करा
सामाजिक कार्यकर्ते-शेतकरी-कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या आर्थिक संस्थांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बुधवारी सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, कामगार आदींनी यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सुजित मुळगुंद, राजकुमार टोपण्णावर, मनोहर पाटील, लक्ष्मीबाई पाटील, राणी पाटील आदींसह फसवणूक झालेल्या अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अध्घ्काऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्र्घ, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. दि बेळगाव डिस्ट्रीक्ट व्हेजिटेबल ग्रोव्हर्स, सेलर्स, परचेसर्स सोसायटी, बेळगाव होलसेल व्हेजिटेबल मचर्ट्सिं मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी, श्री कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी लि., जयकिसान होलसेल व्हेजिटेबल मचर्ट्सिं असोसिएशन व संकल्प क्रेडिट सोसायटी लि. या संस्थांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या फसवणुकीमुळे शेतकरी व गरीब रस्त्यावर आले आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात मुचंडी येथील हणमंत चौगुले व इतरांनी तक्रारी दिल्या आहेत.