महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांडपाणी उघड्यावर सोडल्याप्रकरणी 149 आस्थापनांवर कारवाई करा

12:05 PM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा खंडपीठाचा मडगाव पालिकेला आदेश : सांडपाणी गटारात सोडणे हा गंभीर प्रकार, न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

Advertisement

पणजी : मडगाव शहरातील 149 घरे आणि आस्थापनांकडून सांडपाणी थेट गटारात सोडले जात असल्याचे आढळून आले आहे. मडगाव पालिकेने येत्या 15 दिवसात त्यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून कारवाई करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल मंगळवारी दिला आहे. मडगाव नगरपालिकेचे अॅड. सोमनाथ कर्पे यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने हल्लीच केलेल्या पाहणीत मडगावात 149 घरे आणि आस्थापनांकडून सांडपाणी थेट गटारात सोडले जात असल्याचे आढळून आले आहे. या गटारांतून हे सांडपाणी नाल्यात आणि नंतर शेतात अथवा तलावात जात असून शेवटी साळ नदीत जात असल्याचा दावा याचिकादाराकडून करण्यात आला आहे.

Advertisement

पालिकेने गंभीर पावले उचलावीत

मडगाव पालिकेने या 149 घरे आणि आस्थापनांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसांची येत्या 15 दिवसात कायदेशीररित्या विल्हेवाट लावली जाणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. न्यायालयाने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना, सांडपाणी गटारात सोडणे हा गंभीर प्रकार असून जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्याबाबत पालिकेने गंभीरतेने पावले उचलावीत, असा आदेश दिला. पालिकेने पाठवलेल्या 149 नोटिसा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. त्यावर मंडळानेही या अनधिकृत प्रकाराबाबत कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. यापुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

सोनसडावरील कामे कधी पूर्ण करणार?

उच्च न्यायालयात सुनावणी झालेल्या आणखी एका प्रकरणी सोनसडा कचरा प्रकल्पातील प्रलंबित असलेली कामे मडगाव पालिका किती वेळेत पूर्ण करणार? याविषयी परिस्थितीजन्य अहवाल तयार करण्यास गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाला न्या. भारत देशपांडे आणि न्या. महेश सोनक यांनी आदेश दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article