कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनला रोखण्यासाठी तैवानचा ‘हवाई किल्ला’

06:17 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलच्या धर्तीवर टी-डोम एअर डिफेन्स करणार तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ तैपेई

Advertisement

तैवानने स्वत:च्या हवाई सुरक्षेला मजबूत करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. तैवान आगामी काळात हवाई सुरक्षा यंत्रणेवर 40 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. या रकमेचा मोठा हिस्सा इस्रायली स्टाइलच्या मल्टीलेयर एअर डिफेन्स नेटवर्क टी-डोमच्या खरेदीवर खर्च होणार आहे. टी-डोमला लढाऊ विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रs, ड्रोनचे झूंड आणि अन्य हवाई हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. तैवान दीर्घकाळापासून चीनच्या दबावाला तोंड देत आहे. तैवान हा स्वत:चा भूभाग असल्याचा दावा करत चीन याकरता सैन्य हल्ल्याची तयारी करत आहे. अशास्थितीत टी-डोमद्वारे तैवान एक अभेद्य हवाई सुरक्षा कवच तयार करू पाहत आहे.

 

तैवानचा टी-डोम

तैवानचे अध्यक्ष लाई चिंगते यांनी टी-डोमच्या जलद तैनातीवर जोर दिला आहे. टी-डोम तैवानच्या लोकांसाठी ‘सुरक्षा जाळे’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तैवानने टी-डोमची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी केली होती. याची तुलना इस्रायलच्या आयर्न डोम अँटी-मिसाइल सिस्टीमशी केली जात आहे. परंतु दोन्ही प्रणालींमध्ये मूलभूत अंतर आहे. इस्रायलचा आयर्न डोम मुख्यत्वे कमी पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांना रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. तर टी-डोमला अनेक प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याचा उद्देश चीनची लढाऊ विमाने, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सच्या झुंडला रोखणे आहे.

जुन्या प्रणालीसोबत होणार इंटीग्रेट

तैवानकडे सध्या अमेरिकन पॅट्रियट आणि स्वत:चे स्काय-बो एअर डिफेन्स आहे. याचबरोबर टी-डोम रडार, सेंसर आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत इंटीग्रेट केला जाणार आहे. ही उपकरणे इंटीग्रेट होत प्रभावीपणे काम करू शकतील असे तैवानचे संरक्षणमंत्री वेलिंग्टन कू यांनी सांगितले आहे.  टी-डोमचे दोन हिस्से असतील, यात एक कमांड आणि कंट्रोल सिस्टीम असेल. हा रडार डाटा एकत्र करत धोक्यांची ओळख पटविणार आहे. दुसऱ्या हिस्स्यात इंटरसेप्टर लेयर असेल, यात शस्त्रांचा वापर समोरून येणाऱ्या धोक्यांना नष्ट करण्यासाठी केला जाईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article