कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तैपेई ओपन बॅडमिंटन आजपासून

06:26 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किदाम्बी श्रीकांत, आयुष शेट्टीसह अनेक भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करण्यास सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ तैपेई

Advertisement

खराब फॉर्मचा सामना करणारे किदाम्बी श्रीकांत आणि आयुष शेट्टी आणि अनुपमा उपाध्याय यांच्यासह अनेक तऊण भारतीय शटलर्स आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या आणि 2 लाख 40 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस असलेल्या तैपेई ओपनमध्ये दमदार कामगिरी करण्यास उत्सुक असतील.

एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिलेला श्रीकांत गेल्या काही काळापासून दुखापती आणि फॉर्मशी झुंजत आहे, ज्यामुळे तो सध्याच्या जागतिक क्रमवारीत 61 व्या क्रमांकावर घसरला आहे. 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या 32 वर्षीय श्रीकांतने गेल्या हंगामात 14 स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यात मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठणे ही त्याची सर्वांत चांगली कामगिरी राहिलेली आहे. यावर्षी श्रीकांतने आतापर्यंत पाच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी थायलंड मास्टर्स सुपर 300 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणे ही राहिलेली आहे.

श्रीकांत 2022 च्या जागतिक कनिष्ठ स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यमविऊद्ध मोहिमेची सुऊवात करताना त्याच्या घसरणीवर मात करण्याचा प्रयत्न करेल. 2023 च्या कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आयुष शेट्टी, जो ऑर्लीन्स मास्टर्सच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता, तो या सुपर 300 स्पर्धेत तिसऱ्या मानांकित चिनी तैपेईच्या ली चिया हाओविऊद्ध आपली मोहीम सुरू करेल. महिला एकेरीत युवा अनुपमा उपाध्याय आणि उन्नती हुडा यांचा सामना सलामीच्या फेरीत होईल. महिला गटात अनमोल खर्ब आणि रक्षिता श्री संतोष रामराज या देखील मोठी मजल मारण्याचा प्रयत्न करतील. आकर्शी कश्यप देखील या स्पर्धेत उतरली असून महिला दुहेरीत रश्मी गणेश आणि सानिया सिकंदर खेळतील. इतरांमध्ये माजी राष्ट्रीय विजेता मिथुन मंजुनाथ, रघु मारिस्वामी, मनराज सिंग, आर्यमन टंडन, इरा शर्मा, श्रेया लेले, मानसी सिंग आणि इशाराणी बऊआ हे खेळाडू एकेरीच्या पात्रता फेरीत भाग घेतील

Advertisement
Next Article