For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहव्वूर राणाच्या कोठडीत 12 दिवसांची वाढ

06:47 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
तहव्वूर राणाच्या कोठडीत  12 दिवसांची वाढ
Advertisement

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुंबईतील 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याची कोठडी 12 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्याला सोमवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएने त्याच्या कोठडीत वाढ करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी 10 एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांनी त्याला 18 दिवसांच्या कोठडीत पाठवले होते. ही मुदत सोमवारी संपणार असल्याने राणाला कडक सुरक्षेत विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्यासमोर हजर करण्यात आले. राणाची कोठडी 12 दिवसांनी वाढवण्याच्या एनआयएच्या याचिकेवरील निकाल सोमवारी पटियाला हाऊस कोर्टाने सुरुवातीला राखून ठेवला होता.

Advertisement

एनआयएने 10 एप्रिल रोजी एका विशेष विमानाने तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणले. त्याचे प्रत्यार्पण ‘ऑपरेशन राणा’ या अत्यंत गुप्त मोहिमेंतर्गत झाले. तहव्वूरला ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे अमेरिकन एजन्सी एफबीआयने अटक केली होती. मुंबई आणि कोपनहेगनमध्ये 26/11 चे दहशतवादी हल्ले करण्यासाठी आवश्यक रसद पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी न्यायालयाने राणाला 18 दिवसांच्या कोठडीत पाठवले होते. या काळात, 2008 च्या प्राणघातक हल्ल्यामागील संपूर्ण कट रचण्यासाठी एनआयएने त्याची सविस्तर चौकशी केली. या हल्ल्यात 166 लोक ठार झाले आणि 238 हून अधिक जखमी झाले होते.

Advertisement
Tags :

.