कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुटुंबीयांना फोन करण्यास तहव्वूर राणाला अनुमती

06:51 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारागृहाच्या नियमांनुसार संपर्क साधता येणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला त्याच्या कुटुंबाशी एकदा फोनवर बोलण्याची परवानगी दिली आहे. हे संभाषण कारागृहाच्या नियमांनुसार आणि तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. ही परवानगी देतानाच न्यायालयाने राणाच्या प्रकृतीबाबत अहवालही मागितला आहे. एनआयएने राणाला फोन करण्याची परवानगी दिली आहे. राणाला भविष्यात तुरुंग नियमावलीनुसार नियमित फोन कॉल करण्याची परवानगी द्यावी की नाही, याबाबत न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे.

राणाला एनआयएने ताब्यात घेतले तेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. परदेशी नागरिक म्हणून त्याच्या कुटुंबाशी बोलणे हा राणाचा मूलभूत अधिकार आहे. राणाच्या कुटुंबाला त्याच्या आरोग्याची काळजी आहे, असा युक्तिवाद राणाच्या वकिलाने केला आहे.

याआधी 24 एप्रिल रोजी विशेष न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी राणाची कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागण्याची विनंती फेटाळून लावली होती. एनआयएने त्याच्या याचिकेला विरोध केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला होता. राणाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी दिली तर तो संभाषणादरम्यान महत्त्वाची माहिती शेअर करू शकतो, असा दावा युक्तिवादावेळी करण्यात आला होता.

अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण

तहव्वूर राणा याचे अलिकडेच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील खटल्यासाठी अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून 9 जुलैला त्याच्या कोठडीची मुदत संपणार आहे. भारतात आणल्यापासून विविध तपास यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article