For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉलिवूड सीरिजमध्ये तब्बू

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉलिवूड सीरिजमध्ये  तब्बू
Advertisement

तब्बू आता हॉलिवूडची प्रसिद्ध सीरिज ‘ड्यून : प्रोफेसी’मध्ये दिसून येणार आहे. तब्बू यात ‘सिस्टर फ्रांसेस्का’ या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. ब्रायन हर्बर्ट आणि केविन जे. अँडरसन यांच्याकडून लिहिण्यात आलेली कहाणी ‘सिस्टरहुड ऑफ ड्यून’वर ही आधारित आहे. ‘ड्यून : प्रोफेसी’ सीरिजची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. या सीरिजचे नाव पूर्वी ‘ड्यून : द सिस्टरहुड’ होते. ‘ड्यून : प्रोफेसी’ दोन हरकोनेन बहिणींची कहाणी आहे, ज्या मानवांच्या भविष्याला धोक्यात आणू पाहणाऱ्या शक्तींशी लढतात आणि एका समुदायाची स्थापना करतात, ज्याला बेने गेसेरिट नावाने ओळखले जाईल. तब्बू या सीरिजमध्ये एमिली वॉटसन, ओलिविया विलियम्स, ट्रॅव्हिस फिमेल, जोहदी मे, मार्क स्ट्राँग, सारा-सोफी बौस्नीना, जोश ह्यूस्टन, क्लो ली, जेड अनौका, फोओलीन कनिंघम, एडवर्ड डेव्हिस, एओइफ हिंड्स, क्रिस मेनन आणि शालोम ब्रुने-फ्रँकलिन यासारख्या कलाकारांसोबत काम करणार आहे. तब्बू अलिकडेच ‘क्रू’  चित्रपटात दिसून आली होती. यात तिच्यासोबत करिना कपूर आणि क्रीति सेनॉन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.