For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

तापसी पन्नू करणार लवकरच विवाह

06:23 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
तापसी पन्नू करणार लवकरच विवाह

प्रियकर मॅथियाससोबत संसार थाटणार

Advertisement

तापसी पन्नू लवकरच स्वत:चा प्रियकर मॅथियास बोसोबत विवाह करणार आहे.  मॅथियाससोबत तापसी सुमारे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. तापसीने स्वत:च्या विवाहासाठी उदयपूर हे स्थळ निवडले आहे. तिच्या विवाहसोहळ्यात तापसी आणि मॅथियासचे कुटुंबीयच सामील होतील. तिचा हा विवाह शीख तसेच ख्रिश्चन पद्धतीने पार पडणार आहे.

36 वर्षीय तापसी पन्नू आणि मॅथियास हे मागील 10 वर्षांपासून परस्परांना डेट करत आहेत.  तापसी अनेकदा मॅथियासोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते. स्वत:चा पहिला बॉलिवूड चित्रपट चश्मेबद्दूरचे चित्रिकरण करत असताना तापसी ही मॅथियासला पहिल्यांदा भेटली होती.

Advertisement

43 वर्षीय मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. तो दोनवेळा युरोपियन चॅम्पियन आणि ऑलिम्पिक पदकविजेता राहिला आहे. 2022 मध्ये मॅथियासने बॅटमिंटन या क्रीडाप्रकारातून निवृत्ती स्वीकारली होती. तापसी ही बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. अभिनेत्रीने 2010 मध्ये तेलगू चित्रपट ‘झुम्मंडी नादम’मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.