महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिडनी लेव्हरोनचा नवा विश्वविक्रम, 400 मी.हर्डल्सचे सुवर्ण

06:22 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

अमेरिकेच्या सिडनी मॅक्लाफलिन लेव्हरोनने महिलांच्या 400 मी. हर्डल्सचे सुवर्णपदक पटकावताना नवा विश्वविक्रम नोंदवला. तिने 50.37 सेकंदाची नवी वेळ नोंदवली. नेदरलँड्सच्या अॅना कॉकरेलने रौप्य व फेम्के बोलने कांस्यपदक मिळविले.

Advertisement

स्वताचाच विक्रम मोडण्याची तिची ही आजवरची पाचवी वेळ आहे. या क्रीडा प्रकारात लागोपाठ दोनदा ही शर्यत जिंकण्याचा पराक्रम करणारी ती पहिलीच धावपटू आहे. या क्रीडा प्रकाराचा 1984 लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. 7 ऑगस्टलाच लेव्हरोनने 25 वा वाढदिवस साजरा केला होता. ‘25 वा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते,’ अशा भावना तिने नंतर व्यक्त केल्या.

रौप्य मिळविणाऱ्या कॉकरेलने 51.87 तर कांस्य मिळविणाऱ्या फेम्के बोलने 52.15 सेकंद वेळ नोंदवली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article