स्वायटेक, पेगुलाची कोरिया ओपनमधून माघार
वृत्तसंस्था/ सेऊल, कोरिया
सोमवारपासून येथे सुरू होणाऱ्या कोरिया ओपन महिला टेनिस स्पर्धेतून जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने थकव्याच्या कारणास्तव माघार घेतली आहे. तिच्याप्रमाणे या स्पर्धेची विद्यमान विजेती असणाऱ्या अमेरिकेच्या जेसिका पेगुलानेही बरगडीच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
स्वायटेकने गेल्या जूनमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले असून याआधी तिने गेल्या महिन्यात कॅनडा ओपन स्पर्धेतूनही माघार घेतली होती. अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण पेगुलाने तिचा पराभव केला होता. याशिवाय इलेना रायबाकिनानेही पाठदुखीच्या कारणास्तव माघार घेतली आहे तर एम्मा नेव्हाराने तिचे शेड्युल बदलल्यामुळे तिने या स्पर्धेतून माघार घेतली. कोरिया ओपन स्पर्धा 16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.