For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तलवार हल्ल्याने हादरले लंडन

12:09 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
तलवार हल्ल्याने हादरले लंडन
Advertisement

13 वर्षीय मुलाचा मृत्यू : 2 पोलिसांसमवेत 4 जण जखमी आरोपीला पोलिसांकडून अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनची राजधानी लंडनच्या पूर्व हिस्स्यात चाकूने हल्ले झाल्याने दहशत फैलावली. एक इसम तलवार हातात घेऊन आक्रमकपणे पोलीस अधिकाऱ्यांसमवेत लोकांवरही हल्ले केले आहेत. कथितपणे तलवारीसह या इसमाने अनेक जणांवर चाकूनेही वार केले आहेत. त्यापूर्वी त्याने स्वत:ची कार एका घरात घुसविली होती. या घटनेत एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर 2 पोलिसांसमवेत 4 जण जखमी झाले आहेत. लंडनच्या एका ट्यूब स्टेशननजीक ही घटना घडली आहे.

Advertisement

आरोपीला पोलिसांनी पकडत चौकशी सुरू केली आहे. अटक होण्यापूर्वी 36 वर्षीय आरोपीने नागरिक आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर अग्निशमन आणि बचाव पथकासमवेत अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या हल्ल्यात नेमके किती जण जखमी झाले आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर इलफर्डमध्ये हॅनॉल्ट ट्यूब स्टेशन पोलिसांनी खबरदारीदाखल बंद केले होते.

या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी अतिरिक्त संशयितांचा आम्ही शोध घेत नसल्याचे पोलीस अधिकारी एडे एडेलकन यांनी सांगितले आहे. चाकू हल्ल्यानंतर लंडन शहरातील सुरक्षा वाढविण्यात आली असून अनेक ठिकाणी खबरदारीदाखल पावले उचलण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :

.