For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुतीनगर येथे युवकावर तलवार हल्ला

11:18 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
मारुतीनगर येथे युवकावर तलवार हल्ला
Advertisement

तिघा जणांविरूध्द एफआयआर :  दोघे जखमी

Advertisement

बेळगाव : शुल्लक कारणावरून मारुतीनगर येथे तलवार हल्ला झाला. बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून तलवार हल्ला व दगडफेकीत दोघेजण जखमी झाले आहेत. यासंबंधी गुऊवारी रात्री माळमाऊती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बाहुबली कलकुप्पी (वय 41), कपिल कलकुप्पी (वय 37) दोघेही रा. माऊतीनगर अशी जखमींची नावे आहेत. कपिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्वेश कंग्राळकर, सुरज सुतारसह तिघा जणांविरूध्द भारतीय न्यायसंहिता 115 (2), 118 (1), 109 (1), 352, 351 (5) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भररस्त्यावर वाढदिवस साजरा करताना ही घटना घडली आहे. बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 10.45 च्या सुमारास कपिल माऊतीनगर पहिला क्रॉस येथील पाण्याच्या टाकीजवळून जात होता. त्याचवेळी सुरज सुतार व सर्वेश कंग्राळकर आणखी एका तऊण मिळून भररस्त्यावर वाढदिवस साजरा करीत होते. त्यावेळी सुरजने कपिलला शिवीगाळ करीत दगडफेक केली. त्याचवेळी सर्वेशने कारमधील तलवार काढून कपिलवर हल्ला केला. कपिलचा भाऊ बाहुबली यालाही दगडाने मारहाण करण्यात आले. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक ए. एम. कालीमिरची व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.