इनोव्हा कारमध्ये तलवार अन् कुऱ्हाड
उद्यमबाग पोलिसांकडून शस्त्र जप्त : वाहनांची तपासणी सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
सीबीटीवर विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाला होता. या घटनेनंतर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या सूचनेवरून अँटीस्टॅबिंग स्क्वॉडची स्थापना करून प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तरुणांच्या बॅग व वाहने तपासण्यात येत आहेत. उद्यमबागजवळ एका इनोव्हाची तपासणी करताना कारमध्ये कुऱ्हाड व तलवार आढळून आली आहे.
पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. वाल्मिकी गल्ली येथील मंजू यल्लाप्पा शितीमनी यांची कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये 35 इंची तलवार व एक कुऱ्हाड आढळून आली. स्वत:च्या संरक्षणासाठी किंवा इतरांना धक्का पोहोचविण्यासाठी ही शस्त्रs बाळगली असावीत, असा संशय आहे. उद्यमबाग पोलिसांनी ही दोन्ही शस्त्रs जप्त केली आहेत. माळमारुती पोलिसांनी सांबरा उ•ाणपुलाखाली न्यू गांधीनगर येथील अप्सर शेख या युवकाची दुचाकी अडवून तपासणी केली असता डिक्कीत जांबिया आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच उद्यमबाग पोलिसांना इनोव्हाच्या तपासणीत कारमध्ये शस्त्रs आढळून आली आहेत. पोलिसांनी गांभीर्याने तपासणी मोहीम सुरू केली आहे.
बसस्थानक, बसथांबे व इतर गर्दीच्या ठिकाणी तरुणांची बॅग तपासणी केली जात आहे. याबरोबरच वाहनांची तपासणीही सुरू करण्यात आली असून तपासणीत अमलीपदार्थ व शस्त्रs आढळून येत आहेत. एकंदर चाकू हल्ल्यासारख्या अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ही मोहीम सुरू केली आहे.