For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेक,सित्सपस,अल्कारेझ, सिनेर चौथ्या फेरीत

06:50 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेक सित्सपस अल्कारेझ  सिनेर चौथ्या फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष विभागात ग्रीसचा स्टीफॅनोस सित्सपस, स्पेनचा अल्कारेझ तसेच ग्रीसचा जेनिक सिनेर यांनी प्रतिस्पर्धांवर मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक, ट्युनेशियाची जेबॉर यांनी शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. अमेरिकेच्या सोफिया किनेनचे आव्हान तिसऱ्या फेरीतच समाप्त झाले.

पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात ग्रीसच्या सित्सपसने झेंग झीझेनचा 6-3, 6-3, 6-1 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. सित्सपसने गेल्या एप्रिल महिन्यात माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्याचा चौथ्या फेरीतील सामना ग्रीकच्या अॅमेल्डीशी होणार आहे. अॅमेल्डीने तिसऱ्या फेरीतील सामन्यात रशियाच्या रूबलेव्हचा पराभव केला होता. इटलीच्या जेनिक सिनेरने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविताना रशियाच्या पॅव्हेल कोटोव्हचा 6-4, 6-4, 6-4 असा फडशा पाडला. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या सिनेरचा चौथ्या फेरीतील सामना फ्रान्सच्या मॉलेटशी होणार आहे. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने अमेरिकेच्या सेबेस्टीयन कोर्दाचा 6-4, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement

महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने मारिया बोझकोव्हाचा 6-4, 6-2 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. स्वायटेकने आतापर्यंत तीन वेळेला फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली असून तिने शनिवारी तिसऱ्या फेरीतील सामना जिंकून आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. स्वायटेकचा पुढील फेरीतील सामना बिगर मानांकीत पोटापोव्हाशी होणार आहे. अमेरिकेच्या तृतीय मानांकीत गॉफने चौथी फेरी गाठताना यस्ट्रीमेस्काचा पराभव केला. मात्र अमेरिकेच्या सोफीया किनेनचे आव्हान तिसऱ्या फेरीतच डेन्मार्कच्या बिगर मानांकीत क्लेरा टॉसनने संपुष्टात आणले. टॉसनने किनेनचा 6-2, 7-5 असा पराभव केला. ट्युनेशियाच्या जेबॉरने कॅनडाच्या लैला फर्नांडिसचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. विंबल्डन विजेती मर्केटा व्होंड्रोसोहाने फ्रान्सच्या पॅक्वेटचा 6-1, 6-3 असा पराभव केला. झेकच्या मर्केटाचा पुढील फेरीतील सामना ओलेगा डॅनिलोव्हीकशी होणार आहे. डॅनिलोव्हीकने डोना व्हेकीकचा 0-6, 7-5, 7-6 (8-6) असा पराभव करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत चौथीफेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे इटलीच्या कॉसीरेटोने लुडमिला सॅमसोनोव्हाचा 7-6 (7-4), 6-2 असा पराभव करत पहिल्यांदाच चौथी फेरी गाठली. पुरूष दुहेरीत अँडी मरे आणि डेन इव्हान्स यांना पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. सेबेस्टीयन बायेझ व थियागो वाईल्ड यांनी मरे आणि इव्हान्स यांचा 7-6 (8-6), 7-6 (7-3) असा पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा झाल्याने निर्धारीत वेळेतील सामने सुमारे दोन तास उशीराने सुरू करण्यात आले.

Advertisement
Tags :

.