महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य पुरस्कृत जलयोगाची जलतरणपटूंकडून प्रात्यक्षिके सादर

10:12 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : स्वीमर्स व अॅक्वेरियर्स क्लब आयोजित व लोकमान्य सोसायटी पुरस्कृत 10 व्या विश्व योगा दिनानिमित्त आयोजित केलेल्या जलयोगाची जलतरणपटूंनी प्रात्यक्षिके सादर केल्याने उपस्थित अबालवृद्धांची मने जिंकली. अंध व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंनी योगामधील विविध आसने पाण्यावर तरंगत सादर करीत सर्वांना आकर्षित केले. जेएनएमसी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त जलयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी एमएलसी महंतेश कवटगीमठ, उपकुलगुरू डॉ. नितीन गंगरानी, व्ही. एस. गणाचारी, उद्योजक दिलीप चिटणीस, रोटरी क्लबचे शरद पै, अमित शिंदे, मारिया मोरे, डॉ. नितीन खोत, लोकमान्य हिंडलगा शाखेचे व्यवस्थापक सचिन कावळे व बसवराज उमराणी आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. प्रारंभी माहेश्वरी अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सुरूवातीला सुनिधी हलकारे, समृद्धी हलकारे, निधी सिद्धांत, गीता चेत्राळी, अहिका आर्यवंश यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन फोल्टींग जलतरण करत प्रात्यक्षिके सादर केली.

Advertisement

यशराज व अनिश यांनी 50 मीटर पाण्याच्या खालून पोहत सर्वांचे मन वेधून घेतले. सुनिधी समृद्धी व अनन्या यांनी कपाळावरती पाण्याचे ग्लास ठेवून बॅकस्ट्रोकमध्ये आपली प्रात्यक्षिके सादर केली. समीक्षा, वेदांत, अभिनव, अथर्व, सार्थक, सुनिधी, समृद्धी, सिद्धांत व गीता या सर्व जलतरणपटूंनी वीरभद्रासन, ताडासन, वक्रासन, हनुमानासन, त्रिकोणासन डावी व उजवीकडे सादर केले. त्याचप्रमाणे काडासन, बडकासन, पद्मासन, पर्वतासन, पवन मुक्तासन, शवासन, निद्रासन, व्हर्टीकल नमस्ते आदी आसने सादर करून आपले कौशल्य दाखवून दिले. यावेळी ही आसने पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सर्व जलतरणपटूंचे कौतुक केले. या जलतरणपटूंनी सर्कलमध्ये जलतरण,  जलद फिरणे, बॅकस्ट्रोक पद्धतीचे प्रकार, फ्लायकीक, पाण्याखाली वर जाणे व बाहेर येणे व फ्लोअरकीक आदी प्रकार सादर केले. यावेळी अंध जुळ्या भावांनीसुद्धा जलतरणाची प्रकार सादर करून सर्वांची मने जिंकली.
Advertisement

यावेळी माजी आमदार महांतेश कवठगीमठ म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस संपूर्ण भारत साजरा केला जात आहे. केएलई संस्थेने होतकरू, गरीब व सामान्य मुलांना पोहण्यापासून वंचित राहू नये यासाठी माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या पुढाकाराने हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बेळगावात उभा केला आहे. आतापर्यंत या तलावात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू निर्माण झाले आहेत. पुढील काळात या जलतरण तलावातून ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी जलतरणपटू तयार होतील, अशी आशा व्यक्त करीत सर्वांना योगाच्या शुभेच्छा दिल्या. स्वीमर्स व अॅक्वेरियर्स क्लब व लोकमान्य सोसायटीतर्फे सदर स्पर्धा भरून केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे, असेच कार्य सतत चालू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राही कुलकर्णी यांनी केले. यावेळी जलतरणपटू, शाताई वृद्धाश्रमातील आजी, आजोबा, खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article