कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जलतरण स्पर्धेत स्वीमर्सला सर्वसाधारण विजेतेपद

10:39 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दर्शिका, रिचा, जिनु यांना वैयक्तिक पदक

Advertisement

बेळगाव : इचलकरंजी येथे आयएमसी क्लब आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स क्लबने 12 सुवर्ण, 17 रौप्य, 15 कास्य पदकांसह 44 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या जलतरण तलावात घेण्यात स्पर्धेत दर्शिका निट्टुरकर, राची पवार, जिनु होंडाडकट्टी यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत दर्शिका निट्टुकरने 4 सुवर्ण, 1 कांस्य, रिचा पवारने 3 सुवर्ण, 2 रौप्य, जिनु होंडाडकट्टीने  3 सुवर्ण, 1 रौप्य, रघु काडाट्टीने 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य, तन्वी पै ने 1 सुवर्ण, 1 रौप्य, 4 कांस्य, रितु नरसगौडाने 3 रौप्य, 2 कांस्य, वंश बिर्जे 2 रौप्य, 1 कांस्य, भगतसिंग गावडेने 2 रौप्य, विहान कुलकर्णीने 1 रौप्य, संकेत होसमठने 1 रौप्य, 1 कांस्य, अद्वैकी पी.ने 1 रौप्य, 1 कांस्य, अंश यल्लाजीने 1 रौप्य,1 कांस्य, विहान कोरी, हर्ष चव्हाण, राघव गस्ती यांनी प्रत्येकी 1 कांस्य पदक पटकाविले. वरील सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article