स्विमर्स-ॲक्वेरस सर्वसाधारण विजेते
आंतरराज्य जलतरण स्पर्धा : समिक्षा घसारी व वंश बिर्जे यांचा गौरव
बेळगाव : कोल्हापूर ॲमेच्युर ॲक्वेटिक संघटना-, महाराष्ट्र ॲमेच्युर ॲक्वेटिक संघ आयोजित वीर सावरकर चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व ॲक्वेरस क्लबच्या जलतरणपटूंनी 18 सुवर्ण, 33 रौप्य व 22 कास्य पदकासह 73 पदकांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. समिक्षा घसारी, वंश बिर्जे यांचा खास गौरव करण्यात आला. कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व ॲक्वेरर्स क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये समिक्षा घसारीने 4 सुवर्ण 1 रौप्य, अथर्व राजगोळकरने 4 सुवर्ण 1 कास्य, विहान कोरेने 2 सुवर्ण 3 रौप्य, वेदा मणकापूरने 2 सुवर्ण, 1 कास्य, श्रीदत्ता पुजेरीने 2 सुवर्ण, रिचा पवारने 1 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कास्य, वंश बिर्जेने 1 सुवर्ण 3 कास्य, भगतसिंग व राजू गस्ती यांनी 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कास्य, राजू काडदत्ताने 3 रौप्य, 3 कास्य, चैत्राली मेलगेने 3 रौप्य, 4 कास्य, रुद्र पुजारीने 3 रौप्य, 1 कास्य, साईश पाटीलने 2 रौप्य, 2 कास्य, सर्वोदा सिद्धेश व वैष्णवी काडदत्ताने 2 रौप्य, 1 कास्य, विहान जाधवने 2 रौप्य, वीर चव्हाण-पाटीलने 2 रौप्य, वृधी शानभागने 1 रौप्य, 1 कास्य व अंश यलजीने 1 कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत स्विमर्स व ॲक्वेरस क्लबने 73 पदकांसह सर्वसाधाण विजेतेपद मिळविले. वरील सर्व जलतरणपटूंन जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.