कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्विगीचे एआय-पॉवर्ड अॅप ‘पिंग’लाँच

06:12 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वापरकर्त्यांना आरोग्य तज्ञांसारख्या व्यावसायिक सेवांसह आर्थिक सल्लाही मिळणार

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

फूड डिलीव्हरी आणि जलद वाणिज्य प्लॅटफॉर्म स्विगीने एआय-पॉवर्ड अॅप ‘पिंग’ लाँच केले आहे. या अॅपसह, हायपरलोकल डिलिव्हरी प्लेअरने व्यावसायिक सेवांमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती स्विगीने दिली. स्विगीने पिंगचे वर्णन ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणून केले आहे. हे अॅप शहरी ग्राहकांच्या वाढत्या पण पूर्ण न झालेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

हे अॅप ग्राहकांना आरोग्य आणि कल्याण तज्ञ, आर्थिक सल्लागार, ज्योतिषी आणि आध्यात्मिक तज्ञ, कार्यक्रम नियोजक आणि मनोरंजन करणारे, प्रवास व जीवनशैली तज्ञ आणि शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षकांसह विविध सत्यापित व्यावसायिकांशी जोडण्यास मदत करणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

पिंग अॅपद्वारे पैसे परत करण्याची हमी

स्विगीने सांगितले की, ते सत्यापित व्यावसायिकांना अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह प्रवेश प्रदान करण्यासाठी प्रगत एआय, तज्ञांचे क्युरेटेड नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचा वापर करणार आहे. यासोबतच जर वापरकर्त्याला सेवेमध्ये कोणताही विशेष फायदा मिळाला नाही, तर ते पिंग मनी-बॅक गॅरंटी देखील देईल असे स्विगीने म्हटले आहे. एआय पॉवर्ड पिंग सुरक्षित, स्पॅममुक्त वातावरणात व्यावसायिकांकडून अखंडपणे शोधण्यास सक्षम करून वापरकर्त्यांचे जीवन सोपे करते.

अॅपमध्ये स्मार्ट एआय असिस्टंट राहणार

अॅपमध्ये एक स्मार्ट एआय असिस्टंट देखील असेल, जो वापरकर्त्याच्या शंका समजून घेईल आणि सर्वात संबंधित व्यावसायिक सुचवेल. स्विगीने म्हटले आहे की या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे सेलर अॅप लाँच करणाऱ्या पिंगने त्यांच्या सूटमध्ये वेगाने व्यावसायिकांची भर घातली आहे.

100 हून अधिक स्पेशलायझेशनमध्ये 1000 हून अधिक व्यावसायिकांसह, पिंग ग्राहकांना विविध तज्ञांशी जोडून व्यावसायिक सल्ला मिळविण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे उद्दिष्ट ठेवते. स्विगीने अलीकडेच एऱ्ण्ण्, एwग्gथ्, घ्हूस्art, एwग्ggब् श्ग्हग्s यासह अनेक अॅप्स लाँच केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article