For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेक, रुने, मेदव्हेदेव उपांत्यपूर्व फेरीत

06:58 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेक  रुने  मेदव्हेदेव उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

मुचोव्हा, सित्सिपस, टॉमी पॉल यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स

इंडियन वेल्स मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात होल्गेर रुने, डॅनिल मेदव्हेदेव तसेच महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर झेकच्या मुचोव्हाचे तसेच ग्रीकचा सित्सिपस आणि अमेरिकेचा टॉमी पॉल यांचे आव्हान चौथ्या फेरीतच समाप्त झाले.

Advertisement

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात रुमानियाच्या होल्गेर रुनेने ग्रीकच्या सित्सिपसचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. आता रुनेचा उपांत्यपूर्व फेरीचा साना हॉलंडच्या ग्रिकस्पूरबरोबर होणार आहे. रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदव्हेदेवने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-0 असा फडशा पाडला.या स्पर्धेत मंगळवारी वारंवार पावसाचे अडथळे आल्याने काही सामने अर्धवट स्थितीत रद्द करावे लागले. हॉलंडच्या ग्रिकस्पूरने जपानच्या युसुकी वटानुकीचा 7-6 (7-4), 6-1 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. ग्रिकस्पूरने पहिल्यांदाच एक हजार दर्जाच्या पुरुषांच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात आर्थर फिल्सने मार्को गिरॉनवर 6-2, 2-6, 6-3 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळ्रवले.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात पोलंडच्या माजी टॉपसिडेड तसेच आतापर्यंत दोनवेळा इंडियन वेल्स स्पर्धा जिंकणाऱ्या इगा स्वायटेकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. तिने झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत स्वायटेकने गेल्या तीन सामन्यात केवळ 6 गेम्स गमविले आहेत. स्वायटेकने हा सामना तासभराच्या कालावधीत जिंकला. आता चीनची ऑलिम्पिक चॅम्पियन क्विनवेन आणि युक्रेनची कोस्ट्युक यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर स्वायटेकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. पोलंडच्या स्वायटेकने ही स्पर्धा यापूर्वी 2022 आणि 2024 साली जिंकली होती. कॅलिफोर्नियातील या स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी अमेरिकेच्या मार्टिना नवरातिलोव्हाने असा पराक्रम पहिल्यांदा केला होता. त्यानंतर आता पोलंडच्या स्वायटेकला ही संधी उपलब्ध झाली आहे.

Advertisement
Tags :

.