महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वायटेक, मोनफिल्स, मिचेल्सेन, शेल्टन चौथ्या फेरीत दाखल

06:55 AM Jan 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅडिसन कीज, रायबाकिना, कॅसात्किना, डी मिनॉर यांचीही आगेकूच, फ्रिट्झ, राडुकानू, कॉलिन्स स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

पोलंडची इगा स्वायटेक, फ्रान्सचा गेल मोनफिल्स, नवोदित लर्नर तिएन, अॅलेक्स मिचेल्सेन, बेन शेल्टन, अॅलेक्स डी मिनॉर, मॅडिसन कीज यांनी ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची चौथी फेरी गाठली तर एम्मा राडुकानू, टेलर फ्रिट्झ, कॅरेन खचानोव्ह, लॉरेन्झो मुसेटी, डॅनियली कॉलिन्स यांचे आव्हान संपुष्टात आले.

स्वायटेकने ब्रिटनच्या राडुकानूचा 6-1, 6-0 असा एकतर्फी फडशा पाडत चौथी फेरी गाठली. स्वायटेकची पुढील लढत जर्मनीच्या इव्हा लीसशी होईल. माघार घेतलेल्या खेळाडूच्या जागी मुख्य ड्रॉमध्ये संधी मिळालेल्या लीसने जॅकेलिन क्रिस्तियनचा 4-6, 6-3, 6-3 असा पराभव केला. याशिवाय सहावी मानांकित इलेना रायबाकिना, आठवी मानांकित एम्मा नेव्हारो, नववी मानांकित दारिया कॅसात्किना यांनीही एकेरीची चौथी फेरी गाठली आहे.

रायबाकिनाने 32 व्या मानांकित डायना यास्त्रेम्स्काचा 6-3, 6-4, नेव्हारोने ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरचा 6-4, 3-6, 6-4, कॅसात्किनाने 24 व्या मानांकित युलिया पुतिन्सेव्हाचा 7-5, 6-1, बिगरमानांकति व्हेरोनिका कुडरमेटोव्हाने 15 व्या मानांकित बियाट्रिझ हदाद माइयाचा 6-4, 6-2 असा पराभव केला.

तिएन, मिचेल्सेनचा धडाका कायम

पुरुष एकेरीत मागील वर्षीच्या अमेरिकन ओपनचा उपविजेता टेलर फ्रिट्झला 38 वर्षीय गेल मोनफिल्सने 3-6, 7-5, 7-6 (7-1), 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. 19 वर्षीय युवा खेळाडू लर्नर तिएनने आणखी एक धक्कादायक निकाल देताना फ्रान्सच्या कोरेन्टिन मुटेट 7-6 (12-10), 6-3, 6-3 असे पराभूत करीत पहिल्यांदाच या स्पर्धेची चौथी फेरी गाठली. आणखी एक युवा खेळाडू 20 वर्षीय अॅलेक्स मिचेल्सेनने रशियाच्या 19 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हला 6-3, 7-6 (7-5), 6-2 असे हरवित स्पर्धेबाहेर घालविले. टॉप 10 मधील दुसऱ्या खेळाडूने त्याने हरविले आहे. याआधी त्याने सित्सिपसचे आव्हान संपुष्टात आणले होते. 21 व्या मानांकित बेन शेल्टनने 16 व्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीवर 6-3, 3-6, 6-4, 7-6 (7-5) अशी मात करीत आगेकूच केली. त्याची पुढील लढत मोनफिल्सशी होईल. मिचेल्सेनची पुढील लढत आठव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरशी होईल. डी मिनॉरने फ्रान्सिस्को सेरुन्डोलोवर 5-7, 7-6 (7-3), 6-3, 6-3 अशी मात केली. तिएनची पुढील लढत इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोशी होणार असून सोनेगोने फॅबियन मारोझ्सानचा 6-7, (3-7), 7-6 (8-6), 6-1, 6-2 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला.

पुरुष दुहेरीत श्रीराम बालाजीचे आव्हान समाप्त

भारताचा एन श्रीराम बालाजी व त्याचा मेक्सिकन जोडीदार मिग्वेल अँजल रेयेस व्हॅरेला यांचे पुरुष दुहेरीतील आव्हानही दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. पोर्तुगालच्या नुनो बोर्जेस व फ्रान्सिस्को काब्राल यांच्याकडून त्यांना 6-7 (7-9), 6-4, 3-6 असा झुंजार लढतीत पराभव स्वीकारावा लागला. ही लढत दोन तास नऊ मिनिटे रंगली होती. भारताचा रोहन बोपण्णा हा केवळ एकच खेळाडू स्पर्धेत शिल्लक राहिला असून त्याने मिश्र दुहेरीत झँग शुआइसमवेत शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article