कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वायटेक, गॉफ, अॅन्ड्रीव्हा, निशीकोरी विजयी

06:50 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / माद्रीद

Advertisement

येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स खुल्या 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची कोको गॉफ, मिरा अॅन्ड्रीव्हा तसेच पुरुषांच्या विभागात जपानचा निशीकोरी आणि ब्राझीलचा नवोदित फोन्सीका यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुषांच्या विभागात डेव्हिड गोफीनला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.

Advertisement

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात पोलंडच्या द्वितीय मानांकित स्वायटेकने फिलीपिन्सच्या नवोदित अॅलेक्सेंड्रा इलाचा 4-6, 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. स्वायटेक या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. गेल्याच महिन्यात मियामी येथे झालेल्या स्पर्धेत फिलीपिन्सच्या इलाने स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला होता. स्वायटेकने चालु वर्षीच्या टेनिस हंगामात तीन स्पर्धांमध्ये उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली आहे. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने डायना येस्ट्रेमेस्कावर 0-6, 6-2, 7-5 अशा सेट्समध्ये मात करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. गॉफचा तिसऱ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या अॅन ली बरोबर होणार आहे. अॅन लीने दुसऱ्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या लैला फर्नांडीझचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव केला. महिलांच्या दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात सातव्या मानांकित रशियाच्या 18 वर्षीय मीरा अॅन्ड्रीव्हाने मारी बोझकोव्हाचा 6-3, 6-4 असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ब्राझीलच्या बाया हेदाद माईयाने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या पेराचा 2-6, 6-3, 6-1 तसेच डायना स्नेडरने अमेरिकेच्या केटी व्हॉलीनेट्सचा 6-1, 6-2, इमा नेव्हारोने माया जॉईंटचा 7-5, 7-5 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले.

पुरुषांच्या विभागात जपानच्या निशीकोरीने अॅलेक्सझांडेर व्युकिकचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील निशीकोरीचा हा 450 वा विजयी सामना आहे. निशीकोरीचा पुढील फेरीतील सामना कॅनडाच्या डेनीस शेपोव्हॅलोव्हशी होईल. ब्राझीलच्या 18 वर्षीय फोन्सीकाने इलमेर मॉलेरचा 6-2, 6-3 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. फोन्सीकाचा पुढीलफेरीतील सामना अमेरिकेच्या टॉमी पॉलशी होणार आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत फोन्सीकाने रशियाच्या रुबलेव्हचा पराभव केला होता. लोरेंझो सोनेगोने केमॅनोव्हिकचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र मुलेर विरुद्धच्या सामन्यात फ्रान्सच्या डेव्हिड गोफीनने दुखापतीमुळे माघार घेतली. या स्पर्धेत स्पेनचा अल्कारेझ दुखापतीमुळे सहभागी झालेला नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article