कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हत्तीच्या विष्ठेपासून मिठाई

06:02 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

46 हजार रुपये आहे किंमत

Advertisement

शांघायच्या एका हाय प्रोफाइल रेस्टॉरंटने एक अजब डिश सादर केली आहे. हत्तीच्या मलापासून तयार ही एक प्रकारची मिठाई आहे. या व्यंजनने सोशल मीडियावर ऑनलाइन वाद निर्माण केला आहे. ‘मिक्स्यूज क्यूलिनरी नोट्स’ नावाच्या एका फूड ब्लॉगरने चिनी सोशल मीडिया रेडनोटवर शांघायच्या एका नव्या रेस्टॉरंटचा व्हिडिओ शेअर केला यात तेथे सादर करण्यात आलेल्या एका अजब मिठाईविषयी सांगण्यात आले होते.

Advertisement

हे रेस्टॉरंट इको फ्रेंडली खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक प्रकारच्या नव्या डिशेज सादर करत असते. यात झाडांची पानं, मधयुक्त बर्फाचे तुकडे आणि आता हत्तीच्या मलापासुन तयार करण्यात आलेली मिठाई सामील आहे.

रेस्टॉरंटमध्ये ड्रिंक्स वगळता वर्षावन थीमयुक्त या हत्तीच्या मलाची मिठाई असलेल्या भोजनासाठी ग्राहकांकडून 3,888 युआन (46 हजार रुपये) घेतले जातात. रेस्टॉरंटचे दोन संस्थापक असून यातील एक चीनच्या ब्लांग समुदायाचा तर दुसरा फ्रान्स येथील आहे. त्यांनी शांघायमध्ये रेनफॉरेस्ट रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी युन्नान प्रांतातील वर्षावनांवर 7 वर्षे अध्ययन केले होते.

या रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक एका रोपाची पानं तोडून ती सॉसमध्ये बुडवून खात असतात. भोजनादरम्यान तेथे अनेक प्रकारची अपारंपरिक डिशेज दिली जातात, यातील एका खाद्यपदार्थांमध्ये बर्फाच्या तुकड्यांना मधात बुडवून ठेवलेले असते. तर हत्तीच्या मलाच्या मिठाईच्या बेसला हर्बल परफ्यूम, फळांचा जॅम, आणि मधाच्या सरबताने सजविण्यात आले होते.

अनेक गोष्टींकरता वापर

हत्तीच्या मलामध्ये रोपांच्या रेशे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याचा वापर विविध उत्पादनांमध्ये केला जातो. यापासून कागद देखील तयार केला जातो. परंतु चीनच्या अन्न स्वच्छता कायद्यानुसार खाद्यपदार्थ विषारी असू नयेत, हानीकारक असू नयेत तसेच पोषणसंबंधी मापदंडांची पूर्तता करणारे असावेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article