कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रताळी 500-महाराष्ट्र कांदा दरात 200 रुपयांनी वाढ

06:36 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बटाटा-पांढऱ्या कांद्याचा दर स्थिर : एपीएमसी भाजीमार्केटमध्ये कोथिंबीरसह पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ

Advertisement

सुधीर गडकरी / अगसगे

Advertisement

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात रताळी दर प्रतिक्विंटलला 500 रुपयांनी वधारला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कांद्याचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे. इंदोर बटाटा, आग्रा बटाटा आणि बेळगाव जवारी बटाटा व पांढऱ्या कांद्याचा दर प्रतिक्विंटलला स्थिर आहे. एपीएमसी भाजीमार्केटमध्ये कोथिंबीरसह पालेभाज्यांच्या दरात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे व इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

एपीएमसीमध्ये शनिवार दि. 15 रोजी मार्केटमध्ये महाराष्ट्र कांद्याच्या सुमारे 50 ट्रक विक्रीसाठी आल्या होत्या. त्याचप्रमाणे इंदोर बटाट्याच्या 5 ट्रका, आग्रा बटाट्याच्या 5 ट्रका, कर्नाटक नवीन कांद्याच्या सुमारे 25 ट्रका व कर्नाटक जुन्या कांद्याच्या सुमारे 4 ट्रका विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. कर्नाटक पांढऱ्या कांद्याच्या 2 ट्रका विक्रीसाठी आल्या होत्या. महाराष्ट्र कांदा दर प्रतिक्विंटल 1500 पासून 2400 रुपये, कर्नाटक जुना कांदा दर 800 पासून 2000 रुपये, कर्नाटक नवीन कांदा दर 300 पासून 1400 रुपये, पांढरा कांदा दर क्विंटलला 2500 पासून 4200 रुपये, आग्रा बटाटा दर क्विंटलला 1600 पासून 1800 रुपये भाव झाला आहे. लसूण भाव स्थिर आहे, अशी संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

मार्केट यार्डमध्ये रताळी-बटाटा दाखल

शनिवारी झालेल्या बाजारात रताळ्याचा भाव प्रतिक्विंटलला पाचशे रुपयांनी वाढला आहे. कारण बळीराजा ऊन पडत असल्याने भात कापणी व रबी हंगामातील कडधान्य पेरणीच्या कामात गुंतला आहे. यामुळे शनिवारी बाजारात केवळ 14000 पिशव्यांची रताळी आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. यामुळे आवकेत कमतरता वाटल्याने रताळ्याचा भाव पाचशे रुपयांनी वाढला आहे. रताळी दर क्विंटलला 1500 पासून 2100 रुपये झाला आहे. पांढरा बटाटा दर क्विंटलला 250 पासून 2100 पर्यंत झाला आहे. तर लाल बटाटा दर क्विंटलला 300 पासून 2400 रु.पर्यंत झाला आहे. बटाटा भाव स्थिर आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.

रताळी दरात 500 रुपयांनी वाढ

मागील आठवड्यात शनिवार दि. 8 रोजी  झालेल्या बाजारात विक्रमी रताळ्याची सुमारे चाळीस हजार पिशव्यांची आवक झाली होती. त्यामुळे रताळ्याचा दर गडगडला होता. यावेळी रताळी भाव क्विंटलला 900 पासून 1300 रु. झाला होता. मात्र या आठवड्यात सकाळी थंडी व ऊन पडत असल्याने रबी हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडधान्य पेरणी व भात कापणीच्या कामात बळीराजा गुंतला आहे. त्यामुळे शनिवार दि. 15 रोजी झालेल्या बाजारात रताळ्याची केवळ 14000 पिशव्यांची आवक झाली होती. रताळी आवकेत तुटवडा निर्माण झाल्याने रताळ्याचा दर क्विंटलला पाचशे रुपयांनी वधारला आहे. यावेळी रताळी दर क्विंटलला 1500 पासून 2100 रुपये भाव झाला आहे. सध्या ही रताळी, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी बेळगावहून निर्यात होत आहे. या ठिकाणी थंडी जास्त असल्याने उखडून व भाजून खाण्यासाठी या रताळ्यांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. म्हणून ही रताळी परराज्यातच जास्त निर्यात केली जातात, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा दरात दोनशे रुपयांनी वाढ

सध्या कर्नाटकातील नवीन कांदा काही प्रमाणात पाकड येत आहे. किरकोळ खरेदीदार नवीन कांदा खरेदी करीत आहे. तर महाराष्ट्र जुना कांदा गोवा, कारवार, बेळगाव परिसरातील हॉटेल, कॅन्टीन, मेस व बिरिस्ता बनवण्यासाठी महाराष्ट्र कांद्याचा मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या महाराष्ट्रातील जुना कांदा आवक अंतिम टप्प्यात आली आहे.

कर्नाटकातील नवीन कांदा आवक कमी झाल्याने खरेदीदार महाराष्ट्र कांद्याकडे वळले. त्यामुळे महाराष्ट्र कांद्याचा दर क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. एपीएमसी भाजीमार्केटमध्ये कोथिंबिरसह पालेभाज्यांच्या दरात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे. कारण थंडीमुळे कोथिंबीर उत्पादनात घट झाली आहे व पालेभाज्यांच्या पिकावर देखील परिणाम झाला आहे. यापूर्वी झालेल्या सायक्लोन पावसामुळे भाजीपाल्यांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि रब्बी हंगामामध्ये भाजीपाल्यांच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ होतेच. त्यामुळे कोथिंबीर, लाल भाजी, मेथी, गवार, बिन्स, कोबी शेपू आदी दरात वाढ झाली आहे. तर लिंबू, भेंडी, नवलकोल, बीट, जवारी काकडी, कारले, पुदिना यांचा दर स्थिर आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.

डिसेंबरमध्ये इंदोर बटाटा, नवीन महाराष्ट्र कांदा येण्याची शक्यता

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील नाशिक जिह्यातील नवीन कांदा काढणीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी कांद्याचे पीक उत्तम दर्जाचे आहे. हा कांदा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यामध्ये प्रतीवर्षाप्रमाणे मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी दाखल होतो व या कांद्याला बेळगावसह इतर राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मागणी असते. हा कांदा टिकाऊ व चवदार असतो. त्यामुळे देशभरामध्ये हा कांदा महाराष्ट्रातून मागणीनुसार वेगवेगळ्या राज्यात निर्यात होतो व वर्षभर टिकाऊ येणारा कांदा म्हणून नावाजलेला महाराष्ट्र कांदा आहे. सध्या मागीलवर्षीचा कांदा अजूनही बाजारात विक्रीसाठी आठवड्याला 100 ट्रक बेळगाव मार्केट यार्डमध्ये येत आहेत. या कांद्याला देखील गोवा, कारवार व बेळगाव परिसरामध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा कांदा वर्षभर टिकतो. मात्र या कांद्याला यंदा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे इंदोरमधील बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात केली असून याची काढणीसुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होते व हा बटाटा देखील डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे बेळगाव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येतो. हा बटाटा देखील खाण्यासाठी चवदार असल्याने त्यालाही इतर राज्यांमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. हा बटाटादेखील शीतगृहांमध्ये साठवून ठेवून वर्षभर मागणीनुसार देशातील विविध बाजारपेठेमध्ये निर्यात केला जातो, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी ‘तरुण भारत’ला दिली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article