महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्वाती मलिवाल यांचा आरोप मान्य !

06:31 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी विभव कुमार याने आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मलिवाल यांच्यावर दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या मुख्यालयात हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने मान्य केला आहे. कुमार याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

Advertisement

कुमार याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप स्वत: स्वाती मलिवाल यांनी केला होता. प्रथम कुमार यांनी तो आरोप नाकारला होता. तथापि, या आरोपाचे पुरावे समोर आल्यानंतर पक्षाला ही घटना मान्य करावी लागली आहे. विभव कुमार यांनी मलिवाल यांच्याशी गैरवर्तन केले, हा आरोपही मान्य करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांकडून चौकशी

मलिवाल यांनी कुमार याच्या विरोधात पोलिसात तक्रारही केली आहे. त्यामुळे सोमवारी दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची तपासणीही केली होती. आता पक्षानेही कुमार यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सूचीत केल्याने कुमार याच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच या घटनेमुळे पक्षाचीही कोंडी झाली आहे. मलिवाल या कार्यालयात केजरीवाल यांची वाट पहात बसल्या होत्या. त्यावेळी कुमार याने तेथे येऊन त्यांच्याशी गैरवर्तन केले, असा आरोप आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article