महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राहुल गांधी, पवारांची भेट घेणार स्वाति मालिवाल

06:15 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वत:ची व्यथा मांडणार : केजरीवालांच्या अडचणी वाढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाति मालिवाल यांनी स्वत:वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी ‘इंडिया’ आघाडीत स्वत:च्या पक्षालाच घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मालिवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिले आहे. मालिवाल यांनी स्वत:चे दु:ख सांगत भेटीची वेळ मागितली आहे.

राहुल गांधी आणि शरद पवार यांना लिहिलेल्या पत्राला मालिवाल यांनी सोशल मीडियावरही शेअर केले आहे. दिल्ली महिला आयोगायच अध्यक्ष म्हणून स्वत:च्या कामकाजाचा उल्लेख करत मालिवाल यांनी स्वत:सोबत घडलेला प्रकार नमूद केला आहे. मागील 18 वर्षांपासून मी तळागाळात काम करत आहे. तर 9 वर्षांमध्ये महिला आयोगात कार्यरत असताना 1.7 लाख प्रकरणांची सुनावणी केली आहे. कुठल्याही भीतीशिवाय आणि कुणासमोर न झुकता महिला आयोगाला एका नव्या उंचीवर पोहोचविले आहे. परंतु मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातच मारहाण करण्यात आली आणि मग माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न झाला असा दावा मालिवाल यांनी पत्रात केला आहे. त्यांनी हे पत्र इंडिया आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांना लिहिले असून भेटीसाठी वेळ मागितली आहे.

13 मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या खासगी सचिवाने मला मारहाण केली. परंतु माझ्या पाठिशी उभे राहण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांनी माझ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. सोशल मीडियावर माझ्याविरोधात चालविण्यात आलेल्या मोहिमेमुळे मला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या देण्यात येत आहेत. न्यायच्या लढाईत पीडितांना कशाप्रकारे वेदना आणि एकाकीपणाला सामोरे जावे लागतेय याचा मी अनुभव घेत आहे. ज्याप्रकारे व्हिक्टिम शेमिंग आणि चारित्र्यहन माझ्यासोबत करण्यात आले ते पाहता महिला स्वत:च्या विरोधातील गुन्ह्याप्रकरणी बोलणे टाळू शकतात. या मुद्द्यावर चर्चेसाठी मी तुमचा वेळ इच्छिते, मी तुमच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे असे मालिवाल यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दिल्लीच्या न्यायालयाने केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना आतापर्यंत याप्रकरणी जामीन मंजूर केलेला नाही. विभव कुमारची न्यायालयीन कोठडी 22 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article