स्वाती बोरा, पुजा राणी विजयी
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
येथे सुरू असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी स्वाती बोरा आणि पुजा राणी यांनी आपल्या वजन गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे.
81 किलो वजनगटातील लढतीत स्वाती बोराने रेल्वेच्या अल्फियाचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. स्वाती बोरा ही विद्यमान विश्वविजेती आहे. 75 किलो वजनगटातील झालेल्या लढतीत पूजा राणीने नागालँडच्या रेणूवर 5-0 अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले. पूजाने आतापर्यंत दोनवेळा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली आहेत. महिलांच्या 60 किलो गटात हरियाणाच्या मनीषा मौन तसेच 70 किलो गटात सानेह यांनीही शेवटच्या 16 खेळाडूमध्ये स्थान मिळवले. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशच्या मुष्टीयोद्ध्यांनी आपले वर्चस्व राखले. त्यांच्या अप्राजिता मनीने 57 किलो गटात, रिंकी शर्माने 63 किलो गटात विजय मिळवले. रिंकी शर्माने महाराष्ट्राच्या आर्या बारटक्केचा 5-2 असा पराभव केला. उत्तर प्रदेशच्या रेखाने 66 किलो गटात तर दीपिकाने 75 किलो गटात आपले विजय नोंदवले.