मंद्रुप येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ला सुरुवात
अंत्रोळी :
अंत्रोळी महिलांच्या आरोग्याची काळजी आणि कुटुंब सशक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ मंद्रुप ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, आधार हॉस्पिटलचे डॉ. योगेश राठोड, बालरोगतज्ज्ञ डॉ. हिना बागवान, डॉ. वनमाला गावडे, डॉ. मिताली रेड्डी, डॉ. सुशिल राठोड, दंतचिकित्सक डॉ. प्रथमेश जोशी, एनसीडी अधिकारी ऐश्वर्या सुतार, एल-२ अधिकारी कविता दुधभाते, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, ज्येष्ठ नेते हणुमंत कुलकर्णी, भाजपचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेंडगुदले, सिद्राम हेळकर, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, दयानंद धनशेट्टी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत तालुक्यातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणी शिबिरामध्ये बीपी, शुगर, ओरल कॅन्सर, गर्भवती महिलांची तपासणी, सर्व्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, दंत तपासणी, त्वचा व डोळ्यांची तपासणी, बालकांची आरोग्य तपासणी
विशेष सुविधा लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड, मोफत ईसीजी तपासणी, तसेच आधार हॉस्पिटलतर्फे मोफत औषधोपचार देण्यात आले. या शिबिरात ५०० हून अधिक महिला व बालकांची तपासणी करण्यात आली.
"महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवून संपूर्ण कुटुंब अधिक निरोगी व सक्षम होईल," असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.