महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वामीप्रसाद मौर्य यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

06:22 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समाजवादी पक्षातून अखेर पडले बाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

अखिलेश यादव यांच्यावर पीडीएकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सप महासचिव पदाचा राजीनामा देणारे स्वामीप्रसाद मौर्य यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी केलेल्या काही वक्तव्यांपासून समाजवादी पक्षाने अंग झटकले होते. यामुळे मौर्य हे नाराज झाले होते. तसेच समाजवादी पक्षाच्या अनेक नेत्यांनी मौर्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिलेश यादव यांच्याकडे केली होती. मौर्य यांनी आता नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे, यामुळे सपचे अनेक आमदार या नव्या पक्षात सामील होणार असल्याचे मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मौर्य हे भाजपमधून बाहेर पडत समाजवादी पक्षात सामील झाले होते. यानंतर अखिलेश यादव यांनी मौर्य यांना विधानपरिषदेवर पाठविले होते. मौर्य हे आता 22 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील स्टेडियममध्ये मोठी सभा घेणार आहेत. या सभेतच नव्या पक्षाची घोषणा केली जाणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article