For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरेमठाच्या स्वामीजींची हुबळीतील ‘त्या’ विद्यार्थिनीच्या निवासाला भेट

10:36 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिरेमठाच्या स्वामीजींची हुबळीतील ‘त्या’ विद्यार्थिनीच्या निवासाला भेट
Advertisement

पालकांचे केले सांत्वन, गुन्हेगाराला कठोर शिक्षेची मागणी

Advertisement

बेळगाव : हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये गुरुवारी सायंकाळी चाकूने भोसकून निष्पाप विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आला होता. बेळगाव येथील हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी शुक्रवारी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. रंभापुरी जगद्गुरु डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य स्वामीजींनीही नेहा हिरेमठ या तरुणीचे वडील निरंजनय्या यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. शाळा-कॉलेज मंदिराइतकीच पवित्र असतात. अशा विद्यार्थी घडवणाऱ्या पवित्र ठिकाणी विद्यार्थिनीचा खून होतो. प्रत्येकाने याचा निषेध नोंदविला पाहिजे. सरकारनेही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी जगद्गुरुंनी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी हुबळी येथे निरंजनय्या हिरेमठ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. याचवेळी रंभापुरी जगद्गुरुंनीही फोनवरून संपर्क साधून कुटुंबीयांना धीर दिला.गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्वामीजींनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.