कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेळताना गिळली सोन्याचा बार

06:35 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोटदुखीनंतर एक्सरे काढल्यावर आले समोर

Advertisement

पूर्व चीनमध्ये एका 11 वर्षीय मुलाचे पोट अचानक फुकले आणि तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदनेने व्याकुळ मुलाला त्याचे आईवडिल डॉक्टरांकडे घेऊन गेले, डॉक्टरांनी त्याला किरकोळ औषधे देत घरी पाठविले, तरीही त्याची पोटदुखी कमी झाली नाही. यामुळे डॉक्टरांनी त्याला एक्सरे काढून घेण्याचा सल्ला दिला होता. या एक्सरेचा  अहवाल प्राप्त झाल्यावर डॉक्टरांसह मुलाचे आईवडिलही चकित झाले. कारण मुलाच्या पोटात एका सोन्याचा बार होती, खेळताना 100 ग्रॅमची सोन्याची बार गिळल्याचे मुलाने विचारल्यावर सांगितले आहे.

Advertisement

एक्सरेचा अहवाल प्राप्त झाल्यावर मुलाला रुग्णालयात दाखल करण्या तआले, या घटनेने चिनी सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे आणि हे प्रकरण चर्चेत राहिले आहे. एप्रिलच्या प्रारंभी शस्त्रक्रियेनंतर जियांग्सू प्रांताच्या सूजौ येथील एका प्रमुख चिकित्सा केंद्राच्या डॉक्टरांनी या बहुमूल्य धातूला यशस्वीपणे बाहेर काढले आहे. सोन्याची विट गिळल्यावर कियान नावाच्या मुलाने स्वत:च्या आईवडिलांना स्वत:च्या पोटात सूज जाणवत असल्याचे सांगितले होते, परंतु शरीराच्या उर्वरित हिस्स्यात त्याला कुठलाच त्रास जाणवला नव्हता. चिंतेत पडलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याच्या पूर्ण तपासणीसाठी सूजौ विद्यापीठाशी संलग्न बाल रुग्णालयात नेले होते. एक्सरे परीक्षणातून मुलाच्या आतड्यात एक उच्च घनत्वयुक्त धातूची वस्तू अडकली असल्याचे कळले.

शस्त्रक्रेयेच्या मदतीने बाहेर काढली सोन्याची विट

प्रारंभी डॉक्टरांना मुलामध्ये गंभीर लक्षणे दिसून आली नव्हती. यामुळे त्यांनी केवळ पोट साफ होण्याचे औषध दिले होते. सोन्याचे रॉड स्वाभाविक स्वरुपात बाहेर पडतील अशी अपेक्षा त्यांना होती, परंतु दोन दिवसांपर्यंत असे काहीच न घडल्याने आणि वाढत्या जोखिमीमुळे डॉक्टरांनी सोन्याच्या छडी बाहेर काढण्यासाठी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article