साखरपुडा झाला...पण लग्न जमलं नाही; महायुतीमध्ये मोठा वाद- सतेज पाटील
राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होती पण तरीही त्याला अंतिम स्वरूप मिळालेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उद्धव ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नसल्याचा मिष्किल टोला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे. त्याच बरोबर या फिस्कटलेल्या चर्चेमुळे शिवसेनेने हातकणंगलेमध्ये उमेदवार दिल्याने त्याच्या मतविभागणीचा फटका कोणाला बसणार हे सांगता येणार नसल्याचंह म्हटलं आहे. तसेच सांगलीची चर्चा वरिष्ठ पातळीवर अद्याप सुरू आहे आम्ही अजूनही आशा सोडलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
पहा VIDEO >>> हातकणंगलेमध्ये मतविभागणीचा फटका कोणाला बसेल हे अद्याप सांगता येणार नाही- सतेज पाटील
कोल्हापूरामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला पाठींबा दर्शविण्यासाठी आमदार सतेज पाटील बैठकीस्थळी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी शक्तीपीठ मार्गाचा प्रकल्प हा ठेकेदार यांच्या धार्जिणा असल्याचं म्हटलं असून महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोल्हापूर, धाराशिव यासह जिथून हा रस्ता जातो तेथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला मोठा विरोध आहे. महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर पैसे खर्च केला पाहीजे. ठेकेदारांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा असे आवाहन सतेज पाटील यांनी सरकारला केला आहे.
हातकणंगलेची जागेवरील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना ठाकरे गटाची चर्चा फिस्कटल्यानंतर राजू शेट्टी यांच्या विरोधात सत्यजीत पाटील सरूडकर हा उमेदवार शिवसेनेकडून देण्यात आला. त्यामुळे भाजपविरोधी मतांची विभागणी होऊन महायुतीचा उमेदवार निवडूण येण्याची शक्यता निर्माण होईल अशी अंदाज राजकिय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
ते म्हणाले, हातकणंगलेची जागा ही ठाकरे गटाची असल्याने त्यासंदर्भातील निर्णय त्यांनी घ्यावा अशी अपेक्षा होती. त्यासंदर्भात राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती मात्र त्याला अंतिम स्वरूप मिळालं नाही. आता ठाकरे गटाने हातकणंगेलमध्ये उमेदवार जाहीर केल्याने आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
....साखरपुडा झाला मात्र लग्न नाही
राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीमधील चर्चा फिस्कटल्याबद्दल आमदार सतेज पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्याबर बोलताना त्यांनी राजू शेट्टी महाविकास आघाडी बरोबर यावेत आपली प्रामाणिक भूमिका होती. ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला असल्याने त्यांनी निर्णय घेतला. यावरून स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमू शकलं नसल्याचा मिष्किल टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या उमेदवारामुळे मतविभागणीचा फटका कोणाला बसणार हे अद्याप सांगता येणार नाही. महाविकास आघाडीची या मतदारसंघात मोठी ताकद आता ही ताकत रस्त्यावर उतरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सांगलीबाबत अजूनही आशावादी...
सांगलीबाबतच्या जागेवरून सतेज पाटील यांना छेडले असता त्यांनी वरिष्ठ पातळीवर सांगली बाबतची चर्चा सूरू आहे. विश्वजीत कदम यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही आद्याप आशा सोडली नाही. दिल्लीवरूनच हा प्रश्न मार्गी लागेल असं म्हटलं आहे. एक दोन दिवसात उद्धव ठाकरे शरद पवार आणि खरगे तिघेजण बसून मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असा न्याय आमच्याही उमेदवाराला मिळावा...
नवनीत राणा यांना सुप्रिम कोर्टाकडून दिलासा मिळाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, "कोर्टाच्या निकालावर बोलणे संयुक्तीत ठरणार नाही. मात्र असा निकाल आमच्या रामटेकच्या उमेदवाराला हे मिळावा अशी न्यायदेवतेकडून अपेक्षा आहे. बच्चू कडू हे सध्याच्या सत्तेत असणारे घटक ते तीन टर्म आमदार आणि मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे तंतोतंत माहिती नक्कीच असणार" असेही त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीमध्ये मोठा वाद...
शिंदे गटाच्या ५ खासदारांची तिकीटे कापण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यावर भाष्य करताना आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात आपण ३, ४ महिन्यापुर्वीच बोललो असल्याचं म्हटलं आहे. ६ खासदारांची उमेदवारी संदर्भात शंका आधीपासून होती. यावरून महायुतीमध्ये मोठा वाद सुरु असून भाजप समोरच्याला कशा पद्धतीने वापरून घेतं हे यावरून लक्षात येत आहे.