विवादित जागेत महिलेचा संशयास्पद मृत्यू
कारापूर-डिचोली येथील घटनेने खळबळ : नातेवाईकांसह अनेकांना घातपाताचा संशय,10 डिसेंबरला होती न्यायालयात सुनावणी
डिचोली : कोळशाकातर कारापूर डिचोली एका विवादित व न्यायप्रविष्ट असलेल्या मालमत्तेत लहानशा घरात राहणाऱ्या वासंती सालेलकर या अविवाहित महिलेचा त्याच घरात विजेच्या झटक्मयाने मृत्यू होण्याची घटना काल मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. वासंतीची बहीण घरात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामागे घातपात असण्याची शक्मयता आहे, असा दावा वासंतीच्या घरच्यांनी तसेच गाकुवेध फेडरेशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी, मये मतदारसंघातील युवा नेते अॅड. अजय प्रभुगावकर यांनी केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कारापूर येथील सदर घरात वासंती सालेलकर यांच्यासह त्यांची अन्य एक बहीणही राहते.
ती बहीण पिळगाव डिचोली येथे बहिणीच्या गावी कालोत्सव असल्याने गेली होती. कालोत्सव झाल्यानंतर काल मंगळवार 2 रोजी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास कारापूर येथे घरी पोहोचली असता वासंती घरातील एका दरवाजाजवळ पडलेल्या त्यांच्या दृष्टीस पडल्या. भांबावलेल्या बहिणीने रस्त्यापर्यंत धाव घेऊन लोकांना या घटनेची माहिती दिली. यावेळी येथे जमलेल्या लोकांनी लागलीच 108 ऊग्णवाहिकेला संपर्क साधला. 108 ऊग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली व आतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वासंती सालेलकर यांची तपासणी केली असता ती गतप्राण झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती त्यानंतर डिचोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. तेथून नंतर सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवून देण्यात आला आहे.
श्वानपथक, फॉरेन्सिक पथकाद्वारे तपास
याप्रकरणी डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी घटनेचा पंचनामा केला. घरातील पत्र्याच्या दरवाज्याला विजेचा तीव्र झटका आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून याबाबत वीज खात्याच्या अभियंत्यांना पाचारण करुन तपासणी करण्यात आली. त्यात लोखंडी पत्र्याच्या दाराच्या खाचेतून गेलेल्या विद्युत वाहिनीमुळे विजेचा झटका आल्याचे प्राथमिक स्वरुपात समोर आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी संध्याकाळी श्वानपथक व फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वान घरात घुटमळून घराबाहेर आले, त्यामुळे अधिक काही सापडू शकले नाही. फोरेन्सिक पथकानेही आपल्या पद्धतीने तपासणी केली. या घटनेची माहिती मिळताच मये मतदारसंघातील युवा नेते अॅड. अजय प्रभुगावकर, गाकुवेध फेडरेशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी, पंचसदस्य उज्ज्वला कवळेकर, समाजसेवक स्वप्नेश शेर्लेकर, वासंती सालेलकर यांच्या घरातील मंडळी घटनास्थळी दाखल झाली.
भूमाफियाचे संबंध शोधून काढावे : अॅड. प्रभुगावकर
वासंती सालेलकर या एक लढाऊ महिला होत्या. आपली जमीन वाचवण्यासाठी त्यांचे अटोकाट प्रयत्न सुरु होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या माध्यमातूनही त्यांचा लढा सुरुच होता. त्यांचा संशयास्पद मृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. या मृत्यूमागे घातपाताचा दाट संशय असून सखोल चौकशी पोलिसांनी व सरकारनेही करावी. या प्रकरणाचा संबंध भूमाफियामार्फत केवळ गोव्यातच आहे की दिल्लीपर्यंत आहे तेही शोधून काढावे, अशी मागणी युवा नेते अॅड. अजय प्रभुगावकर यांनी यावेळी केली.
वासंतीचा मृत्यू संशयास्पदच : रामकृष्ण जल्मी
गाकुवेध फेडरेशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी यांनी, वासंती सालेलकर यांचा मालमत्तेच्या विषयावरून मोठ्या प्रमाणात छळ होत होता. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेही झालेले आहेत. या मालमत्तेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. या प्रकरणात सरकारी वकीलाकडून योग्य पाठिंबा मिळत नसल्याने त्यांनी स्वत: खासगी वकीलाची नेमणूक केली होती व त्याची सुनावणी येत्या 10 डिसेंबर रोजी होती. त्यामुळे याप्रकरणी वासंती सालेलकर यांच्या बाजूने हे प्रकरण सकारात्मक येण्याची शक्मयता होती. त्यापूर्वीच त्यांचा संशयास्पद मृत्यू होणे अनेक प्रŽ निर्माण करीत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिस खात्यातर्फे व्हावी व सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली.
वासंतीचा मालमत्तेवरुन छळ सुरु होता : ओमप्रकाश
यावेळी उपस्थित वासंती सालेलकर यांच्या नातलग ओमप्रकाश कवळेकर यांनीही या मालमत्तेसंदर्भात वासंती यांना वेगवेगळ्या प्रकारे छळले जात होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला यापूर्वी धोका निर्माण झाला होता, असे सांगितले व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली.