महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मार्कंडेयनगरात बालिकेचा संशयास्पद मृत्यू

11:15 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजी-आजोबांकडून खुनाचा संशय 

Advertisement

बेळगाव : मार्कंडेयनगर-कंग्राळी खुर्द येथील एका बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यासंबंधी तिच्या आजीने एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. आजी-आजोबांनी मात्र खुनाचा संशय व्यक्त केला आहे. समृद्धी रायण्णा न्हावी (वय 4 वर्षे) मूळची राहणार परकनट्टी, ता. हुक्केरी, सध्या रा. मार्कंडेयनगर असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. तिला उलट्या सुरू झाल्यामुळे सुरुवातीला खासगी दवाखान्यात दाखविण्यात आले. रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना तिचा मृत्यू झाला आहे. समृद्धीचे वडील रायण्णा हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सध्या छत्तीसगडमध्ये सेवेत आहेत. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी समृद्धीच्या वडिलांसह तिघा जणांविरुद्ध नागपूर येथे एफआयआर दाखल झाला होता. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर रायण्णा यांनी दुसरा विवाह केला आहे. सध्या समृद्धी आपल्या सावत्र आईकडे रहात होती. तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुतगा येथील तिच्या आजी-आजोबांना कळविण्यात आली. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. सावत्र आईवर संशय घेऊन खुनाची शक्यता वर्तवली. सावत्र आई सपना हिला मात्र हा आरोप मान्य नाही. समृद्धीला फिट्स येत होत्या. प्रेमाने तिचा सांभाळ करीत होते. अचानक उलट्या सुरू झाल्या. आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे, असे तिचे म्हणणे आहे. समृद्धीची आजी रेणुका सुनील हंपण्णावर, रा. मुतगा यांनी यासंबंधी सोमवारी रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. आजीने तिच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सीआरपीसी कलम 174 सी अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून शवचिकित्सेनंतर या बालिकेच्या मृत्यूचे खरे कारण उजेडात येणार आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article