For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर 5-2 फॉर्म्युल्यानुसारच स्थायी समितींची निवड

11:54 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर 5 2 फॉर्म्युल्यानुसारच स्थायी समितींची निवड
Advertisement

सर्व स्थायी समितींची निवडणूक बिनविरोध : प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी जाहीर केला निकाल 

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची मुदत संपली होती. त्यामुळे नव्याने स्थायी समितींची निवडणूक प्रक्रिया 2 जून रोजी मनपाच्या सभागृहामध्ये पार पडली. चारही स्थायी समितींची निवडणूक बिनविरोध झाली असून 5-2 या फॉर्म्युल्यानुसार ही निवडणूक झाली. प्रादेशिक आयुक्त एस. पी. शेट्टण्णावर यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी साऱ्यांचेच अभिनंदन केले. मनपातील चार स्थायी समितींची निवडणूक मंगळवारी घेण्याचे जाहीर झाले होते. त्यानुसार सकाळी 9 वा. अर्ज दाखल करून घेण्यात आले. दुपारी 12 पर्यंत यासाठी वेळ देण्यात आला होता. त्या कालावधीत चारही स्थायी समितीच्या नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले. दुपारी 3 वा. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला.

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या सदस्यपदी सत्ताधारी भाजपकडून अभिजित जवळकर, संतोष पेडणेकर, रवीराज सांबरेकर, जयतीर्थ सवदत्ती, उदय उपरी यांचे अर्ज भरण्यात आले तर विरोधी गटातर्फे म. ए. समितीचे शिवाजी मंडोळकर, बसवराज मोदगेकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील सर्व अर्ज वैध ठरवत बिनविरोध साऱ्यांची निवड झाल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी जाहीर केले. आरोग्य व शिक्षण स्थायी समितीसाठी भाजपकडून श्रीशैल कांबळे, रूपा चिक्क्लदिनी, दिपाली टोपगी, राजु भातकांडे, माधुरी राघोचे यांचे अर्ज दाखल करण्यात आले. तर विरोधी गटातर्फे अस्मिता पाटील, लक्ष्मी लोपडी, रमेश मैलाप्पगोळ यांचे अर्ज दाखल करण्यात आले. या स्थायी समितीसाठी 8 अर्ज दाखल झाल्याने माघार घेण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यावेळेत रमेश मैलापगोळ यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने या स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली.

Advertisement

अर्थ व कर स्थायी समितीसाठी भाजपतर्फे नैत्रावती भागवत, पुजा पाटील, नितीन जाधव, भरमानंद मिरजकर, अॅड. हनुमंत कोंगाली, विरोधी गटातर्फे जरीना फतेखान, ईकरा मुल्ला यांनी आपले अर्ज दाखल केले. एकूण 7 अर्ज दाखल झाल्याने या स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी जाहीर केले. लेखा स्थायी समितीसाठी भाजपतर्फे मंगेश पवार, सारीका पाटील, शंकर पाटील, प्रिया सातगौडा, रेश्मा कामकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले. तर विरोधी गटातर्फे रेश्मा भैरकदार, शकीला मुल्ला यांचे अर्ज दाखल झाले एकूण सात अर्ज दाखल झाल्याने या स्थायी समितीची निवडणूकही बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.

मनपाच्या चारही स्थायी समितींची निवडणूक बिनविरोध झाली एकूण 56 नगरसेवक उपस्थित होते. 2 नगरसेवक गैरहजर राहिले. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्रादेशिक आयुक्त एस. एस. बिरादार, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी या निवडणूकीचे कामकाज पाहिले. सत्ताधारी भाजप गटाचे गटतेने तसेच विरोधी गटाचे गटनेते मुजम्मील डोणी यांची बैठक होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. प्रत्येक स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केल्यानंतर सदस्यांनी त्याला बाकडे वाजवून सहमती दर्शविली. निवडणूक होताच सर्व नगसेवकांनी एकमेकाचे अभिनंदन करत एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे. महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक अजीम पटवेगार, नगरसेवक शहीदखान पठाण, नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह इतर नगसेवक उपस्थित होते.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

स्थायी समितीची निवडणूक असल्यामुळे महानगरपालिकेच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभागृहामध्ये केवळ नगरसेवकांनाच प्रवेश देण्यात आला होता. प्रवेश देताना नगरसेवकांचे मोबाईलही जमा करण्यात आले होते. नगरसेवक व अधिकारी वगळता इतर कोणालाही आता प्रवेश देण्यात आला नाही.

Advertisement
Tags :

.