For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भात खरेदीत काटामारीचा संशय, व्यापाऱ्याचे टेम्पो सोडून पलायन

10:56 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भात खरेदीत काटामारीचा संशय  व्यापाऱ्याचे टेम्पो सोडून पलायन
Advertisement

 जाफरवाडी येथील घटना :  शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया : नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने नाराजी

Advertisement

वार्ताहर/कडोली

भात खरेदी करताना काटामारीचा संशय आल्याने याचा शेतकऱ्यांनी जाब विचारताच संतोष नामक भात व्यापाऱ्याने पळ काढल्याची घटना सोमवारी सकाळी जाफरवाडी येथे घडली. काटामारी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्याकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भात खरेदी दरात मोठी घसरण असताना पुन्हा काटामारी करून शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून शासनाचे व्यापाऱ्यांच्या वजन काट्यावर लक्ष गेलेले नाही हे पुन्हा एकदा सोमवारी जाफरवाडी येथे सिद्ध झाले. गेले 15 दिवस कणबर्गी येथील संतोष नामक व्यापारी जाफरवाडी गावात भात खरेदी करीत आहे. जवळपास 500 पोती भात खरेदी केली आहेत. त्यामुळे हजारो रुपयाची लूट केल्याचे निदर्शनास येत आहे. गरीब शेतकऱ्यांची अशा प्रकारे व्यापारी लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी दाद कुणाकुडे मागायची?.

Advertisement

प्रतिक्व्ंिाटल 10 किलोची तफावत

सदर व्यापारी जाफरवाडी येथे भात खरेदी करीत असताना वजन काट्याबद्दल शेतकऱ्यांना शंका आली. दुसऱ्या वजन काट्यावर भाताचे पोते वजन केले असताना 10 किलोची तफावत आढळून आली. त्यामुळे सदर व्यापाऱ्याने जाफरवाडी येथे अनेक शेतकऱ्यांचे काटामारी करून मोठे आर्थिक नुकसान केल्याचे सिद्ध झाले आहे.

पोलिसांसह रयत संघटना कार्यकर्त्यांकडून पाहणी

काटामारीचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात येताच आपली धडगत नसल्याचे पाहून सदर व्यापाऱ्याने टेम्पोसह आपले साहित्य तेथेच टाकून पळ काढला. या व्यापाऱ्याला फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. टेंपो अद्याप तेथेच आहे. सदर प्रकाराची माहिती रयत संघटना कार्यकर्त्यांना मिळताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह येऊन पाहणी केल्याचे समजते. याबाबत अद्याप पोलीस केस दाखल केली नसली तरी, पोलीस केस दाखल करणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

अशा व्यापाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. वजनकाट्यांची तपासणी व्हावी, अशी मागणीही केली होती. पण शासनाकडून कोणतीच दखल घेतली नाही. तेव्हा सामान्य शेतकरी असाच भरडला जाणार का ?  असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement
Tags :

.