For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्ण जन्मभूमी सर्वेक्षणावरील स्थगिती कायम

06:49 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्ण जन्मभूमी सर्वेक्षणावरील स्थगिती कायम
Advertisement

सर्वोच्च न्यायालयात आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीसंबंधीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नोव्हेंबरपर्यंत टळली आहे. सध्या वादग्रसत परिसराच्या सर्वेक्षणावर असलेली अंतरित स्थगिती जारी राहणार आहे. उच्च न्यायालयाने सर्व याचिकांना सुनावणीयोग्य मानले आहे. त्या आदेशाचे अध्ययन केल्यावरच पुढील सुनावणी केली जाऊ शकते. या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकावे लागतील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

या खटल्याच्या सुनावणीला वेळ लागणार आहे. याप्रकरणी दीर्घ सुनावणीची गरज आहे. 21 ऑक्टोबरनंतरच याप्रकरणी सुनावणी केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित एकूण 18 खटल्यांची सुनावणी स्वत:कडे हस्तांरति करण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाच्या विरोधात मुस्लीम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हिंदू पक्षकाराचा दावा

कृष्ण जन्मभूमी मंदिर आणि त्याला लागून असलेल्या मशिदीच्या वादाशी संबंधित हिंदू पक्षकारांकडून दाखल करण्यात आलेली याचिका प्रार्थनास्थळ (विशेष तरतूद) अधिनियमाचा उल्लंघन करणारी असल्याचा मुस्लीम पक्षकाराचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. हिंदू पक्षकाराच्या वतीने दाखल याचिकांमध्ये औरंगजेबाच्या काळात निर्माण करण्यात आलेली मशिद हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. कृष्ण जन्मभूमीवरील मंदिर पाडून त्यावर ही मशीद उभारण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षकारांचा आहे.

हिंदू पक्षकारांकडून कॅविएट

हिंदू पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात कॅविएट दाखल करत मुस्लीम पक्षकाराच्या याचिकेवर  सुनावणीवेळी आमचीही बाजू ऐकून घेतली जावी अशी विनंती केली आहे. उच्च न्यायालयाने मंदिर-मशीद वादाशी संबंधित 18 प्रकरणांच्या पोषणीयतेच्या विरोधात दाखल याचिका फेटाळली होती.

Advertisement
Tags :

.