Kolhapur News : पुणे–बेंगळुरू महामार्गावर कामांचा खोळंबा ; प्रवासी हैराण, टोप–संभापूर फाटा मार्ग ठप्प
पुणे–बेंगळुरू महामार्गावर कामांच्या दिरंगाईमुळे वाहतूक कोंडी
टोप : पुणे–बेंगळुरू महामार्गावर सुरू असलेल्या कामांच्या दिरंगाईमुळे वाहतूक कोंडी तीव्र झाली आहे. विशेषतः टोप बिरदेव मंदिर परिसर ते संभापूर फाटा या रस्त्यावरील जाममुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. काम मंद गतीने सुरू असल्याने प्रवास त्रासदायक ठरत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कामे दीर्घकाळापासून रखडल्याने आजही वाहनचालकांना लांबच लांब ट्रॅफिकचा सामना करावा लागला. महामार्गावरील पथरीकरण, रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने तासन्तास अडकून राहिली.टोप बिरदेव मंदिर ते संभापूर फाटा या दरम्यान तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
अरुंद मार्ग, सुरू असलेली खोदाई, आणि अपुऱ्या पर्यायी मार्गांमुळे वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसते.पिक-ऑवरमध्ये तर शेकडो वाहनांची रांग लागल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार वर्ग त्रस्त झाला आहे.स्थानिकांनी शासन आणि प्राधिकरणांकडे महामार्गाच्या कामांना गती देण्याची आणि जाम टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.