For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांचे निलंबन

07:59 PM Jul 03, 2025 IST | Radhika Patil
राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांचे निलंबन
Advertisement

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर समांतर कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या घटनेचे उल्लंघन, आज्ञाभंग आणि बेकायदेशीर कृतीसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी  ही कारवाई करत लांडगे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पवार यांनी याबाबत लांडगे यांना दिलेल्या पत्रामध्ये 25 जून रोजी परिषदेने जाहीर केलेल्या कार्यकारी समितीच्या निवडणुका तसेच  २६ आणि २७ जुलै रोजी मतदान होईल अशा सूचना केल्याचे म्हटले आहे. उपाध्यक्ष यांना  निवडणूक अधिकारी म्हणून निवडणुकीचे पर्यवेक्षण तर देखरेख करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना विनंती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, माजी न्यायमूर्ती ए. एम. बदर  यांनी जबाबदारी स्वीकारत वेळापत्रक जारी केले. तरीही लांडगे यांनी २७ जून २०२५ रोजी एक पत्र जारी करून १६ जुलै रोजी समांतर निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. याला चुकीचे, दुर्भावनापूर्ण आणि सचिव म्हणून कर्तव्यांचे उल्लंघन ठरवून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच दिवसात कारणे स्पष्ट करून उत्तर देण्याचे निर्देश पवार यांनी पत्राद्वारे दिले आहेत.  हे प्रकरण निकाली निघेपर्यंत लांडगे यांना निलंबित करत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.