महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निलंबित पोलिस हवालदार संजय तळकर याला अटक

12:15 PM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडे लाच मागितल्याचे प्रकरण

Advertisement

पणजी : केरी-पेडणे येथील पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडे लाच मागितल्याप्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) गुन्हा नोंद केलेल्या पोलीस हवालदार संजय तळकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. याबाबतचा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश शैरीन पॉल यांनी दिला आहे. या आदेशानंतर काल शुक्रवारी संजय तळकर याला अटक करण्यात आली आहे. या लाच प्रकरणी आरोपाची तसेच एसीबीने दाखल केलेल्या गुह्याची दखल घेऊन किनारी पोलीस अधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांनी आदेश जारी करून हवालदार संजय तळकर याला यापुर्वीच सेवेतून निलंबित केले आहे.

Advertisement

संजय तळकर घेतली लाच

पॅराग्लायडिंग कंपनीचे पृथ्वी एच. एन. या व्यावसायिकाने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी आपल्याकडे पर्यटन खात्याचा कायदेशीर परवाना असूनही केरी किनारी पोलीस स्थानकाचे हवालदार संजय तळकर याने आपल्याकडे दर महिना 8 हजार ऊपयांची लाच मागितल्याचे नमूद केले होते. व्हॉट्सअॅपद्वारे सतत फोन करून तळकर त्यांना धमकावत होता. त्यामुळे दबावाखाली त्यांनी ऑनलाईन पैसे पाठवून त्याचा फोटोही पाठवला होता.

या तक्रारीची दखल घेऊन एसीबीचे उपअधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मेलिटो फर्नांडिस यांनी तळकर याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याची माहिती तळकर याला मिळाल्यानंतर त्याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सदर प्रकरणी तपास प्राथमिक पातळीवर असल्याने आणि काही साहित्य जप्त करण्याचे बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील तळावलीकर यांनी केला. आरोपी हा स्वत: पोलीस असल्याने तो तेरेखोल किनारी पोलीस स्थानकातील कागदपत्रीय पुराव्यात हस्तक्षेप करण्याची तसेच तक्रारदाराला आणि साक्षीदारांना धमकावण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी स्टेशन डायरीतही फेरफार झाल्याचे पुरावे सापडले आहेत. तसेच हवालदार संजय तळकर हा लाच मागतानाचे रिकॉर्डिंग प्रमाण मानण्यात आले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यामुळे संजय याच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाने तळकर याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article